“लोक काय म्हणतील?” नाना पाटेकरांच्या मनात…; मोठ्या मुलाच्या निधनाने आयुष्य बदललं

मराठी, हिंदी आणि दक्षिणात्या सिनेमात आपल्या वेगळ्या अभिनयाने स्वत:ची ओळख निर्माण करणारे नाना पाटेकर नेहमीच रोखठोक बोलण्यासाठीही ओळखले जातात.

“लोक काय म्हणतील?” नाना पाटेकरांच्या मनात…; मोठ्या मुलाच्या निधनाने आयुष्य बदललं
Nana Patekar Emotional Story

मराठी, हिंदी आणि दक्षिणात्या सिनेमात आपल्या वेगळ्या अभिनयाने स्वत:ची ओळख निर्माण करणारे नाना पाटेकर नेहमीच रोखठोक बोलण्यासाठीही ओळखले जातात. पण जर त्यांच्या वैयक्तित आयुष्याबाबत खूप ते फार कमी बोलतात. काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच त्यांच्या मोठ्या मुलाच्या मृत्यूवर मौन सोडले होते आणि बोलतानाही ते भावूक झाले होते.

ऐकून चाहतेही झाले भावूक
नाना पाटेकर यांना दोन मुले होती. मोठ्या मुलाचे नाव हे त्यांनी ऋषींच्या नावावरुन दुर्वास ठेवले होते.दुर्वास जन्मापासून आजारी असायचा. याबद्दस बोलत असताना नाना म्हणाले होते की, माझा मोठा मुलगा जन्मापासून आजारी होता. त्याला अनेक आजार होते. त्याच्या एका डोळ्याचा प्रॉब्लेम होता, त्याला दिसत नव्हतं. तो जेव्हा जन्माला आता तेव्हा मी स्वार्थी विचार केला.

हेही वाचा-“राजकारण सोडून द्या पण, ते माझ्या…” दादांच्या आठवणींनी नाना गहिवरले होते; जिवलग मित्रांची मैत्री निधनानंतरही चर्चेत

”तु पुढे म्हणाले,”मी सतत हाच विचार करायचो की लोक काय म्हणतील?नाना पाटेकरचा मुलगा असा कसा? पण त्या बाळाला काय वाटत असेल, त्याला काय त्रास होत असेल, याचा मी कधीच जराही विचार केला नाही.

मी फक्त लोक काय विचार करतील, यायाच विचार करत राहिलो. नानांनी सांगितले की दुर्वास हा फक्त आमच्यासोबत फक्त अडीज वर्षे होता. अडीच वर्षांनंतर त्याचे निधन झाले. त्याने आमच्यासोबत अडीच वर्षे घालवली. मग तो कायमचा गेला. काय करणार, आयुष्यात बऱ्याचदा काही गोष्टी घडचाच, असे म्हणजे त्यांनी या विषयावर जास्त बोलणे टाळले होते.

हेही वाचा-‘शेतातच माझं शेवटचं कार्य व्हावं’ नाना पाटेकरांची अंतिम इच्छा; पार्थिव ‘या’ गावी नेणार, अंत्यसंस्काराची मोठी अपडेट

नेहमी कडक तसेच रागीट भूमिका करणाऱ्या नानांच्या आयुष्यातील ही सगळ्यात हळवी बाजू समोर आल्यावर अनेक चाहतेही भावूक झाले होते.

Jai Maharashtra Marathi News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number