Tuesday, November 18, 2025 03:58:39 AM

Netflix: नेटफ्लिक्सवर रील्ससारखे फिचर येणार, मोबाईलवर शॉर्ट व्हि़डीओ पाहता येतील

शॉर्ट व्हिडीओ क्षेत्रातील स्पर्धा तीव्र होत आहे. नेटफ्लिक्सने आता इन्स्टाग्राम रील्स प्रमाणेच मोबाईलवर एक नवीन व्हर्टिकल फीड लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.

netflix नेटफ्लिक्सवर रील्ससारखे फिचर येणार मोबाईलवर शॉर्ट व्हि़डीओ पाहता येतील

Netflix: शॉर्ट व्हिडीओ क्षेत्रातील स्पर्धा तीव्र होत आहे. नेटफ्लिक्सने आता इन्स्टाग्राम रील्स प्रमाणेच मोबाईलवर एक नवीन व्हर्टिकल फीड लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी सध्या या फिचरची चाचणी घेत आहे. या फिचरमुळे वापरकर्त्यांना चित्रपट आणि टीव्ही शोच्या शॉर्ट क्लिप्स पाहता येतील. नेटफ्लिक्सने याचे वर्णन सोशल फीडऐवजी डिस्कव्हरी आणि सॅम्पलिंग फिचर म्हणून केले आहे. चला या फिचरचा तपशीलवार अभ्यास करूया.

हे फिचर कसे काम करेल?
या फिचरमुळे वापरकर्त्यांना नेटफ्लिक्स शो आणि चित्रपटांचे छोटे व्हिडीओ दिसतील. यावर टॅप करून, वापरकर्ते पूर्ण एपिसोड किंवा चित्रपट पाहू शकतील. बरेच वापरकर्ते अनेकदा काय पाहायचे हे ठरवण्यात बराच वेळ घालवतात. हा वेळ कमी करण्यासाठी हे फीचर सादर करण्यात आले आहे. प्रेक्षकांना चित्रपटाशी संबंधित ट्रेलर किंवा क्लिप पाहण्यासाठी इतर अॅप्सना भेट देण्याची गरज टाळण्यासाठी नेटफ्लिक्स काम करत आहे आणि हे फिचर ऑन-प्लॅटफॉर्म फीड म्हणून काम करेल.

हेही वाचा: Starlink Demo Run: भारतात स्टारलिंकच्या लाँचिंगची तयारी पूर्ण! 30-31 ऑक्टोबर रोजी मुंबईत घेण्यात येणार डेमो

नेटफ्लिक्सचे एका बाणाने अनेकांवर लक्ष्य
हे फिचर सादर करून नेटफ्लिक्स प्रेक्षकांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर जास्त काळ टिकवून ठेवू शकेल. हे एक मार्केटिंग टूल म्हणून देखील काम करेल. यामुळे कंपनीला वितरणासाठी इतर प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहावे लागणार नाही. नेटफ्लिक्स त्यांची सेवा अॅक्टिव्ह वाटावी यासाठी लाइव्ह मतदान, पार्टी गेम आणि अॅनिमेटेड होम एक्सपिरीयन्ससह अनेक इंटरॅक्टिव्ह लेयर्स एक्सप्लोर करत आहे.

'टिकटॉकची कॉपी नाही'
नेटफ्लिक्सच्या सीटीओ एलिझाबेथ स्टोन म्हणाल्या की, त्यांची कंपनी शॉर्ट-फॉर्म व्हिडीओ अॅप्सची कॉपी करण्याचा प्रयत्न करत नाही. कंपनीचे लक्ष प्रेक्षकांच्या पसंतींने चालण्यावर आहे. या फीडमध्ये प्रदर्शित होणारी सामग्री वापरकर्त्याने तयार केलेली नसून ती प्लॅटफॉर्मवर आधीच उपलब्ध असलेल्या मूळ प्रोग्रामिंगमधून घेतली जाईल.


सम्बन्धित सामग्री