महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हीट’चा कहर! मुंबईसह कोकणात तापमानाचा पारा चढणार, विदर्भ-मराठवाड्यासाठी अलर्ट जारी

राज्यात ऑक्टोबर हिटला सुरुवाात झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली असून 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा बसू लागला आहे.

महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हीट’चा कहर! मुंबईसह कोकणात तापमानाचा पारा चढणार, विदर्भ-मराठवाड्यासाठी अलर्ट जारी
Weather Update October Heat

राज्यात ऑक्टोबर हिटला सुरुवाात झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली असून ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा बसू लागला आहे. दरम्यान आज 5 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पावसापेक्षा उष्ण आणि कोरड्या हवामानाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे. काही भागांत तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर प्रचंड उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागाने या भागात ‘येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत उन्हापासून काळजी घेणे आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. मुंबईसह कोकणात आज तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे. त्यामुळे उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सोलापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हवामान प्रचंड दमट आणि उष्ण राहणार आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात मुख्यत्वे आकाश निरभ्र राहून कडक ऊन आणि उकाडा वाढेल.

हेही वाचा- दुष्काळाने संसार उद्ध्वस्त केला; सर्वस्व पणाला लावलं, तरी कर्ज फिटेना… गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

तर पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत गेल्या तीन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. या भागांत सध्या कमाल तापमान 31 अंश, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत एकाच वेळी तीन प्रकारच्या हवामानाचा अनुभव नागरिकांना येतोय. दुपारी कडक ऊन, मध्येच ढगाळ वातावरण आणि रात्री किंवा पहाटे गारवा अशी स्थिती निर्माण झाली आहे. या भागात कमाल तापमान 31 अंश, तर किमान तापमान सुमारे 20 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

तसेच मराठवाडा आणि विदर्भातही ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचे चटके बसू लागले आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान सुमारे 31 अंश, तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस असून हवामान कोरडे आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात कमाल तापमान 33 अंश, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

नागपूरमध्ये मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू असतानाच नागपूरकरांना ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणू लागला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात कमाल तापमान 35 अंशावर पोहोचल्याने दुपारच्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. कमाल तापमान सरासरीपेक्षा 1.4 अंशाने अधिक तर किमान तापमान 19.6 अंशांवर असल्याने रात्रीच्या तापमानात घट नोंदविण्यात आली आहे. कमी पाऊस आणि कोरड्या हवामानामुळे उष्णतेची तीव्रता जाणवत आहे. ऑक्टोबर महिन्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number