बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावचा बहुचर्चित ‘मालिक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा फुल्ल ऑन एक्शनने भरलेला ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात राजकुमार पहिल्यांदाच एका गँगस्टरच्या भूमिकेत पहायला मिळत आहे. राजकुमार यानं अनेक चित्रपटांमध्ये लव्हर बॉय आणि मध्यमवर्गीय माणसाच्या भूमिका साकरलेल्या आहेत. आता तो गँगस्टरच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
रिलीज करण्यात आलेल्या ट्रेलरची सुरुवात जोरदार पोलिस फोर्स आणि धमाकेदार डायलॉगने होत आहे. त्यानंतर राजकुमार राव बंदूक खांद्यावर घेतलेल्या थरारक अॅक्शनसह समोर येताना पहायला मिळत आहे. 2 मिनिटं 45 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये एक सामान्य माणूस कसा गँगस्टर बनतो आणि राजकारणात प्रवेश करून आमदार होण्याचा प्रयत्न करतो, हे दाखवण्यात आलंय.
हुमा कुरैशीचं आयटम साँग
मालिक चित्रपटात मानुषी छिल्लर राजकुमारच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. सौरभ शुक्ला, स्वानंद किरकिरे आणि अंशुमान पुष्कर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ट्रेलरमध्ये हुमा कुरैशीच्या आयटम साँगची झलकही पहायला मिळत आहे.
शेफाली जरीवालाच्या मालमत्तेचा दावेदार कोण असेल? काय आहे नियम? जाणून घ्या
मालिक मानुषी छिल्लरसाठी महत्वाचा चित्रपट ठरणार आहे. मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण अद्याप तिलं मोठं यश मिळालेलं नाही. त्यामुळे मालिककडून तिला मोठ्या अपेक्षा आहेत.
हेही वाचा – शेफाली जरीवालाच्या मृत्यूच्या मीडिया कव्हरेजवर वरुण धवन भडकला
मालिक 11 जुलैला चित्रपटगृहात
पुल्कित दिग्दर्शित ‘मालिक’ 11 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी विक्रांत मॅस्सी आणि शनाया कपूरचा रोमँटिक चित्रपट ‘आंखों की गुस्ताखियां’ देखील रिलीज होणार आहे. ‘मालिक’ची कथा 1988 च्या इलाहाबादवर आधारित आहे. जिथं सत्ता, गँगवॉर आणि राजकारण यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.