Ranveer Singh: ‘डॉन 3’मधून माघार घेताच रणवीर सिंह अडचणीत; अभिनेत्याला इंडस्ट्रीमधून केलं बॅन

'डॉन 3' चित्रपटातून रणवीर सिंह बाहेर पडल्याच्या चर्चेमुळे बॉलिवूडमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे.

Ranveer Singh: ‘डॉन 3’मधून माघार घेताच रणवीर सिंह अडचणीत; अभिनेत्याला इंडस्ट्रीमधून केलं बॅन

बॉलिवूडमधील बहुचर्चित ‘डॉन 3’ चित्रपटावरून मोठा वाद समोर आला असून अभिनेता रणवीर सिंह अडचणीत सापडल्याची चर्चा रंगली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) या संघटनेने रणवीर सिंहविरोधात कठोर भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. ‘डॉन 3’ चित्रपटातून अचानक बाहेर पडल्यामुळे निर्मात्यांचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप करण्यात येत असून, रणवीरविरोधात ‘नॉन-कोऑपरेशन’चा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

या प्रकरणामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता फरहान अख्तर यांनी रणवीर सिंहविरोधात FWICEकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संघटनेने या विषयावर बैठक घेतली आणि पुढील निर्णयासाठी चित्रपटसृष्टीतील सदस्यांना रणवीरसोबत काम न करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा:Anoushka Shankar : 'त्याने मला उचलले…मी हवेत तरंगत होते, घट्ट मिठी मारली…'; अनुष्का शंकरने सांगितला क्रेझी फॅनचा अंगावर काटा आणणारा अनुभव, पोस्ट व्हायरल

‘डॉन’ फ्रँचायझीला बॉलिवूडमध्ये विशेष लोकप्रियता मिळाली आहे. याआधीच्या भागांमध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत झळकला होता. ‘डॉन 3’ मध्ये रणवीर सिंह नव्या डॉनच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. मात्र चित्रपटाच्या शूटिंगपूर्वीच रणवीरने अचानक प्रकल्पातून माघार घेतल्याच्या बातम्यांमुळे निर्माते आणि संघटना नाराज झाल्याचं सांगितलं जात आहे.

माहितीनुसार, चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनसाठी आणि इतर तयारीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. रणवीरच्या निर्णयामुळे निर्मात्यांना सुमारे 45 कोटी रुपयांचा फटका बसल्याचा दावा करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून आता वाद अधिक चिघळल्याचं दिसत आहे.

हेही वाचा: Salman Khan Instagram Account: भाईजानच्या चाहत्यांची धाकधूक वाढली; पापाराझींशी वादानंतर सलमान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक गायब

FWICEने या प्रकरणाला गंभीर मानत चौकशी सुरू केली आहे. तसेच या वादासंदर्भात पत्रकार परिषद घेण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. संघटनेचे काही पदाधिकारी या पत्रकार परिषदेत अधिकृत भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, रणवीर सिंहकडून अद्याप या संपूर्ण वादावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. ‘डॉन 3’मध्ये आता पुढे कोण झळकणार आणि हा वाद नेमका कुठे जाऊन थांबणार, याकडे संपूर्ण बॉलिवूडचं लक्ष लागलं आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number