Saturday, February 08, 2025 07:04:09 PM

Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder Case : सरपंच देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराड आरोपी नाही?

बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. यानंतर देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून अनेक ठिकाणी मूकमोर्चे काढण्यात आले.

santosh deshmukh murder case  सरपंच देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराड आरोपी नाही

बीड: बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. यानंतर देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून अनेक ठिकाणी मूकमोर्चे काढण्यात आले. बीड, धाराशिव, परभणी, पुणे आणि वाशिमसह संपूर्ण राज्यभरात याची निदर्शने दिसून आली. संतोष देशमुख हत्येप्रकरणी सात आरोपींवर मकोका लावण्यात आलाय. मात्र चर्चेचा विषय म्हणजे यात वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलेला नाही. बीड पोलिसांनी सात पोलिसांवर मकोका लावला असून वाल्मिक कराडवर मात्र खंडणी प्रकरणी अटक करण्यात आलीय.याप्रकरणी सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे, जयराम चाटे या आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

काय आहे मकोका कायदा?
महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज्ड क्राइम अ‍ॅक्ट म्हणजेच मकोका कायदा संघटीत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी 1999 मध्ये आणला. त्यापूर्वी असलेल्या टाडा कायद्याच्या धर्तीवर मकोका हा कायदा आणला गेला. हप्ता वसुली, खंडणी वसुली, अपहरण, हत्या, सामुहिक गुन्हेगारी या विरोधात मकोका लावला जातो. 

दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सात आरोपींवर मकोका लावण्यात आला असून वाल्मिक कराडवर मकोका कायदा लावण्यात आला नाही. यामुळे आता सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असून नेमकं आता हे प्रकरण काय वळण घेत हे पाहणं महत्वाचं ठरणारे. 


सम्बन्धित सामग्री