पीक पंचनामे अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार?, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Satara News : सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अतिवृष्टी आणि पिकांच्या नुकसानीनंतर प्रशासनाकडून पंचनाम्यांची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली असून, शेतकऱ्यांना मदतीबाबत काय नियोजन आहे? जाणून घ्या सविस्तर.
महाराष्ट्र बातम्या
Maharashtra Farmer News

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुरसानीचे पंचनामे हे अंतिम टप्प्यात आलेले आहेत. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे नियोजन प्रशासनाने केलेले आहे. याबाबतची माहिती जिल्ह्याधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.

सध्या जिल्ह्यात पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. महिना अखेरपर्यंत सर्व पंचनामे हे पूर्ण होतील, असे त्यांनी सांगितले आहे. पंचनामे पूर्ण होताच क्षेत्र आणि नुकसानीच्या याद्याही तयार केल्या जाणार आहे. मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्याप्रमाणे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अनुदान आणि नुकसान भरपाई मिळावी म्हणून प्रशासन प्रयत्नशील आहे. या सर्व याद्या वेळेत तयार होतील याची खात्री प्रशासन म्हणून आम्ही घेत आहोत, असे आश्वासन जिल्ह्याधिकारी पाटील यांनी दिलेले आहे. त्यामुळे बळीराजाला दिवाळीपूर्वी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version