सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुरसानीचे पंचनामे हे अंतिम टप्प्यात आलेले आहेत. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे नियोजन प्रशासनाने केलेले आहे. याबाबतची माहिती जिल्ह्याधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.
सध्या जिल्ह्यात पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. महिना अखेरपर्यंत सर्व पंचनामे हे पूर्ण होतील, असे त्यांनी सांगितले आहे. पंचनामे पूर्ण होताच क्षेत्र आणि नुकसानीच्या याद्याही तयार केल्या जाणार आहे. मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्याप्रमाणे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अनुदान आणि नुकसान भरपाई मिळावी म्हणून प्रशासन प्रयत्नशील आहे. या सर्व याद्या वेळेत तयार होतील याची खात्री प्रशासन म्हणून आम्ही घेत आहोत, असे आश्वासन जिल्ह्याधिकारी पाटील यांनी दिलेले आहे. त्यामुळे बळीराजाला दिवाळीपूर्वी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.