सरकारी आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकाराने संताप; चिमुकलीसह पालकांना रुग्णवाहिकेच्या बाहेर….; बीडमध्ये माणुसकीला काळिमा

Beed News : बीडच्या दिंद्रुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ११ वर्षीय आजारी मुलीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेताना रुग्णवाहिका नाकारल्याचा आरोप आहे. तसेच मुलीच्या कुटुंबीयांना अपमानास्पद भाषा वापरल्याचा दावा करण्यात आला असून, संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

सरकारी आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकाराने संताप; चिमुकलीसह पालकांना रुग्णवाहिकेच्या बाहेर….; बीडमध्ये माणुसकीला काळिमा
Beed News

बीडच्या दिंद्रुड प्राथमिक आरोग्य केंद्रात मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आलेली आहे. उपचारासाठी दाखल केलेल्या अवघ्या 11 वर्षीय मुलीला मोठ्या रुग्णालयात रेफल करुनही रुग्णवाहिका देण्यास नकार दिला. 29 सप्टेंबर रोजी या मुलीला आरोग्य केंद्रात दाखल केले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी रेफर केल्यानंतर चिमुकलीला वडिलांनी रुग्णवाहिकेत ठेवले.

मुलीला रुग्णवाहिकेत ठेवले. मात्र, तेथील डॉक्टरांची चक्क डिझेलसाठी पैसे आहेत का, अशी विचारणा केली. यावर आजीने खायलाही पैसे नाहीत, चार लेकरांचा सांभाळ कसा बसा करतोय, अशी डॉक्टरांसमोर व्यथा मांडली. त्यानंतर डॉक्टने सांभाळ होत नाही तर कशाला पैदा केली, अशी अर्वाच्छ भाषा वापरल्याच आरोप करण्यात आलेला आहे. पीडित कुटुंब हे मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करते. गरीब रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध असतानाही न देणे आणि अपमानास्पद वागणूक दिल्याने संताप व्यक्त होत आहे.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number