प्रशासकीय वर्तुळात खळबळ! एकाच वेळी 12 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

राज्य सरकारने बुधवारी रात्री उशिरा या फेरबदलाचे अधिकृत आदेश जारी केले. या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये नगरविकास, ऊर्जा, महसूल, क्रीडा आणि परिवहन यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे.

प्रशासकीय वर्तुळात खळबळ! एकाच वेळी 12 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
IAS officers transfer

तेलंगणा प्रशासनात एकाच वेळी 12 वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने बुधवारी रात्री उशिरा या फेरबदलाचे अधिकृत आदेश जारी केले. या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये नगरविकास, ऊर्जा, महसूल, क्रीडा आणि परिवहन यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याने या निर्णयाची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे.

जयेश रंजन यांची उचलबांगडी आणि नवीन जबाबदारी

या मोठ्या प्रशासकीय फेरबदलात 1992 च्या बॅचचे वरिष्ठ आयएएस अधिकारी जयेश रंजन यांच्या नियुक्तीतील बदल विशेष चर्चेत राहिला आहे. नगरविकास विभागाचे विशेष मुख्य सचिव असलेल्या रंजन यांनी नुकतीच स्वेच्छानिवृत्तीची (VRS) प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता त्यांची पर्यावरण, वन आणि विज्ञान-तंत्रज्ञान विभागाच्या विशेष मुख्य सचिवपदी रवानगी करण्यात आली आहे. यासोबतच क्रीडा, हेरिटेज आणि विविध महापालिकांच्या विशेष अधिकारीपदाच्या अतिरिक्त कार्यभारातून त्यांना मुक्त करण्यात आले आहे.

ऊर्जा, महसूल अन् क्रीडा विभागात महत्त्वाचे बदल

राज्य सरकारने जारी केलेल्या यादीनुसार, 1992 च्या बॅचचे अधिकारी विकास राज यांची ऊर्जा विभागाच्या विशेष मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर 1996 चे आयएएस अधिकारी नवीन मित्तल यांच्याकडे पंचायत राज आणि ग्रामीण विकास विभागाचा पदभार सोपवण्यात आला आहे. याशिवाय, 1995 च्या बॅचच्या अधिकारी ए. वाणी प्रसाद यांच्याकडे क्रीडा विभागाचा, तर 1997 च्या बॅचच्या अधिकारी शैलजा रमैयर यांची महसूल विभागाच्या प्रधान सचिवपदी वर्णी लागली आहे.

हेही वाचा –  दिवाळीत गर्दीचं टेन्शन संपणार! 450 फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाड्या धावणार; कुठून, कधी आणि कोणत्या मार्गांवर?

इतर प्रमुख सनदी अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या

इतर महत्त्वाच्या बदल्यांमध्ये राहुल बोज्जा यांच्याकडे आदिवासी कल्याण विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तसेच सरफराज अहमद यांच्याकडे ‘HMDA’ च्या आयुक्तपदासोबतच नगरविकास विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. 2013 च्या बॅचच्या अधिकारी श्रुती ओझा यांची महिला व बालविकास विभागात, तर एम.डी. मुशर्रफ अली फारुकी यांची आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. जितेश व्ही. पाटील यांच्याकडे दक्षिण वीज वितरण कंपनीच्या अध्यक्षपदाची महत्त्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number