मुंबई आणि आसपासच्या शहरांत गेल्या काही वर्षात वाढलेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण झाले आहे. या कोंडीतून प्रवाशांची सुटका होण्यासाठी एमएमआरडीएकडून बरेच मोठे प्रोजेक्ट हाती घेण्यात आलेले आहे. त्यातील सर्वात चर्चेत असलेला ऐरोली ते काटई नाका हा एलिव्हेटेड कॉरिडॉर आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे.
नवीन उन्नत मार्गामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार
खरं तर या मार्गावर विशेषता मुंब्रा आणि शिळफाटा परिसरात दररोज तासन्तास ट्रॅफिक जाम असते. येथील नागरिकांना या जामचा दरदिवशीच प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मात्र आता याच असंख्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तब्बल 12.71 किलोमीटर लांबीचा हा अत्याधुनिक कॉरिडॉर सुरु झाल्यानंतर ठाणे ते नवी मुंबई हा प्रवास फक्त आणि फक्त 40 मिनिटांत पूर्ण होणार आहे. याच मार्गामुळे मुलुंड ते काटई नाका हे अतंर थेट 7 ते 8 किलोमीटर इतके कमी होईल आणि प्रवाशांना संपूर्म सिग्नल-फ्री प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
या शहरासाठी फायदेशीर
महत्त्वाचे म्हणजे ऐरोलीतील आयटी पार्क, ठाणे- बेलापूर औद्योगिक क्षेत्र तसेच कल्याण-डोंबिवलीमधील रहिवाशांसाठी सुद्धा हा कॉरिडॉर गेमचेंजर ठरणार आहे. विशेषतहा नव्या मार्गावर वाहतूक वळवल्याने शिळफाटा रोड आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील ताण हा कायमचा कमी होमार आहे.
कधी पासून करता येणार प्रवास?
एमएमआरडीएने नुकतेच ऐरोलीतील भारत बिजली जंक्शन येथे 95 आणि 110 टन इतके वजनाचे अवजड असलेले स्टील गर्डर बसवले आहेत. या नव्या डिझाईनमुळे वाहनचलकांना ठाणे-बेलापूर रोजवरुन आता थेट ऐरोली-काटई मार्गावर जाता येणार आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
विजयादशमीदिनी महत्त्वाच्या घडामोडी | Dussehra Festival News Live