तुकाराम मुंढेंच्या FDA चा सिप्लाला मोठा धक्का! दणकेबाज कारवाई करत गोदामाचे औषध विक्री परवाने रद्द

पुणे वडकी येथील सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेसच्या गोदामाचे औषध विक्री-वितरण परवाने अन्न व औषध प्रशासनाने रद्द केल्याची बातमी समोर आली आहे.

तुकाराम मुंढेंच्या FDA चा सिप्लाला मोठा धक्का! दणकेबाज कारवाई करत गोदामाचे औषध विक्री परवाने रद्द
FDA Action Against Cipla

अन्न व औषध प्रशासनाने सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेसच्या वडकी, पुणे येथील C&F गोदामाचे औषध विक्री-वितरण परवाने रद्द केले आहेत. Reactin Plus Tablets या Schedule H औषधाच्या पॅकेजिंगवर औषधाच्या वापराबाबत विविध जाहिरातीचे दावे आणि मानवी आकृतीचा वापर केल्याचे तपासणीत आढळले.

यासोबतच गोदामात औषधांचे बॉक्स थेट जमिनीवर ठेवणे, साठ्यावर धूळ साचणे, मुदतबाह्य औषधांसाठी स्वतंत्र व्यवस्था नसणे, आवश्यक नोंदींचा अभाव आणि संगणकीय नोंदी व प्रत्यक्ष औषधसाठ्यात तफावत अशा अनेक त्रुटी आढळल्याचे FDAने म्हटले आहे.

हेही वाचा- ‘सणांना नाही, अन्नाच्या गुणवत्तेला..’ प्रसादावरील कारवाईवर तुकाराम मुंढेंचे रोखठोक उत्तर

या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर FDAने पूर्वीची कारवाई मागे घेत कंपनीला नव्याने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. कंपनीने लेखी उत्तर दिल्यानंतर 21 सप्टेंबरला वैयक्तिक सुनावणीही घेण्यात आली.

कंपनीचे स्पष्टीकरण, तपासणीतील निष्कर्ष आणि संबंधित कायदेशीर तरतुदींचा विचार करून परवाना प्राधिकरणाने 1 ऑक्टोबर 2026 रोजी परवाने रद्द करण्याचा कारणयुक्त आदेश दिला. औषध बाजारात आणणाऱ्या Marketer चीही वैधानिक जबाबदारी असल्याचे FDAने स्पष्ट केले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number