‘त्या’ तिघांचीही कुंडली मांडली! राजस्थान पोलिसांनी केले आरोपींच्या नावांसह पळून जाण्याच्या प्लॅनचे धक्कादायक खुलासे; एक अल्पवयीन तरुणही सामील

'अँटी-गँगस्टर टास्क फोर्स' आणि कोटा शहर पोलिसांनी अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे संयुक्त कारवाई करत राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावर अवघ्या 15 मिनिटांत सापळा रचून तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

‘त्या’ तिघांचीही कुंडली मांडली! राजस्थान पोलिसांनी केले आरोपींच्या नावांसह पळून जाण्याच्या प्लॅनचे धक्कादायक खुलासे; एक अल्पवयीन तरुणही सामील
SP Tejaswini Gautam PC

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या खळबळजनक गोळीबार प्रकरणाबाबत एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर हल्ल्यानंतर फरार झालेले मुख्य संशयित आरोपी नेपाळच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत होते, असा मोठा गौप्यस्फोट राजस्थान पोलिसांनी केला आहे. ‘अँटी-गँगस्टर टास्क फोर्स’ आणि कोटा शहर पोलिसांनी अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे संयुक्त कारवाई करत राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावर अवघ्या 15 मिनिटांत सापळा रचून तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे संपूर्ण पोलीस वर्तुळात खळबळ उडाली असून, आरोपींच्या पुढील प्रवासाचा आणि कटाचा पर्दाफाश झाला आहे.

पुणे-जयपूर एक्सप्रेसमधून दिल्लीमार्गे नेपाळला पळून जाण्याचा होता प्लॅन

कोटाच्या पोलीस अधीक्षक (SP) तेजस्विनी गौतम यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देताना सांगितले की, रविवारी सकाळी संशयित आरोपी रेल्वेने प्रवास करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी पुणे-जयपूर एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून प्रवास करत होते. दिल्ली गाठून तिथून सीमा ओलांडून नेपाळला पळून जाण्याचा त्यांचा पक्का बेत होता. मात्र, कोटा शहर पोलिसांनी तातडीने पावले उचलत रेल्वे स्थानकावर संपूर्ण ट्रेनची कसून तपासणी केली आणि अत्यंत चलाखीने तिन्ही संशयितांना जेरबंद केले.

अटकेत असलेल्या आरोपींची ओळख उघड

पोलिसांनी पकडलेल्या संशयितांची नावे समोर आली आहेत. यामध्ये हरियाणाच्या सोनीपत येथील रेहान ऊर्फ सुक्का, बिहारच्या बेगुसराय येथील हृतिक कुर्मी ऊर्फ रोशन (जो काही काळापासून मुंबईत राहत होता) आणि एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

हेही वाचा – रात्री उशीरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली टायगर श्रॉफची भेट; म्हणाले, ‘मुंबईत गँगची दादागिरी खपवून घेणार नाही’

प्राथमिक चौकशीदरम्यान असे निष्पन्न झाले आहे की, हा संपूर्ण कट कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडलेला असून, आरोपी अनिल पंडित यांच्या थेट संपर्कात होते. जरी हल्ल्यात वापरलेली मुख्य शस्त्रे अद्याप हाती लागली नसली, तरी आरोपींची कसून चौकशी करून शस्त्रांचा शोध घेतला जात आहे. मुंबई पोलिसांचे विशेष पथक आधीच कोटा येथे दाखल झाले असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सर्व आरोपींना ‘ट्रान्झिट रिमांड’वर मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले जात आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number