अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहू येथे गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुहू परिसरातील पुष्पा पार्क येथे ही संपूर्ण घटना घडली असून सुदैवाने यात टायगर श्रॉफ जखमी झाला नाही. या हल्ल्यावेळी टायगर श्रॉफ आणि त्याचा चालकच वाहनात होते, अशी माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिलेली आहे. गोळीबाराचे कारण अजूही अस्पष्ट आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारल्याची माहिती आहे. मात्र अजूनही संपूर्ण स्पष्ट झाले नाही. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सुरक्षा वाढवली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात धक्कादायक अपडेट
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात धक्कादायक अपडेच समोर आलेली आहे.या संपूर्ण घटनेत एकाच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली असून तो गंभीर जखमी झालेला आहे. जखमीवर मुंबईतील कूपर रुग्णालयात तातडीने उपचार सुरु करण्यात आलेले आहे. सध्या डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आलेली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.