Pickles Health Risks: लोकांच्या ताटात दही, कांदा, लिंबू किंवा लोणचं असलं की जेवणाला जणू एक वेगळाच रंग येतो. अनेकांना जेवताना भाज्यांपेक्षा आंबट-तिखट लोणचंच जास्त आवडतं. साधी पोळी-भाजी असो किंवा डाळ-भात असो, बाजूला लोणचं नसल्यास जेवण अपूर्ण वाटतं. पण हेच लोणचं काही वेळा आरोग्यासाठी गंभीर धोकाही ठरू शकतं. चव वाढवणाऱ्या या छोट्या गोष्टीमुळे शरीरात घातक विषारी जीवाणू जाऊ शकतात, हे ऐकून अनेकांना धक्का बसेल. मात्र यामागचं विज्ञान समजून घेतलं तर लोणचं सुरक्षितरीत्या खाणं तितकंच सोपं आहे.
हेल्थ तज्ज्ञांच्या मते, चुकीच्या पद्धतीने बनवलेलं किंवा साठवलेलं लोणचं शरीरात ‘बोटुलिझम’ नावाचा जीवाणू वाढवू शकतं. हा जीवाणू टॉक्सिन्स तयार करतो आणि ते शरीरात गेल्यास स्ट्रोकसारखा परिणाम, पॅरालिसिसची लक्षणं किंवा उलट्या-ओकाऱ्या, चक्कर, ब्लर व्हिजन अशी गंभीर चिन्हं दिसू शकतात. भारतात घरगुती पद्धतीने लोणचं बनवण्याची परंपरा खूप जुनी आहे, पण त्यातील सुरक्षितता पाळली नाही तर ही परंपरा धोक्यात बदलू शकते. त्यामुळे लोणचं बनवल्यावर किंवा बाजारातून आणल्यानंतर काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे.
हेही वाचा:Health Tips: दह्यात साखर मिसळून खावे की मीठ, जाणून घ्या दही खाण्याची योग्य पद्धत
पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोणचं कधीही साध्या प्लास्टिकमध्ये न ठेवणं. अनेकदा घरात जुन्या प्लास्टिक डब्यांमध्ये किंवा मेटलच्या डब्यात लोणचं ठेवण्याची सवय असते. पण लोणच्यामध्ये मसाले, मीठ, व्हिनेगर, तेल यामुळे मेटल रिऍक्शन होऊ शकतो आणि प्लास्टिकमध्ये केमिकल लीकेज होण्याची शक्यता असते. म्हणून काचेची बरणीच सर्वोत्तम पर्याय मानला जातो. तीही बरणी वापरण्याआधी गरम पाण्याने धुवा, पूर्णपणे कोरडी करा आणि मगच त्यात लोणचं भरा. ओल असली तर बॅक्टेरिया वाढण्याचा धोका जास्त असतो.
दुसरी गोष्ट तेल आणि सिरका (व्हिनेगर) यांचं प्रमाण. दोन्ही नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह मानले जातात. काही लोक मसालेदार लोणचं करताना तेलाचा वापर कमी करतात, पण वरचा ‘ड्राय स्पॉट’ हा सर्वात धोकादायक असतो. लोणच्यातील वरचा भाग जर कोरडा दिसू लागला, मसाला कोरडा पडला, तेलाची पातळी खाली गेली तर फंगस आणि बॅक्टेरियासाठी ते परफेक्ट वातावरण असतं. म्हणून बरणी उघडली की नियमितपणे तेल किंवा सिरका लेव्हल तपासणं आवश्यक आहे.
हेही वाचा:Beetroot Chilla Recipe: रोज रोज तोच नाश्ता करून कंटाळा आलाय? 'या' पद्धतीने बनवा स्वादिष्ट आणि पौष्टिक बीटरूट चिल्ला
तिसरी आणि शेवटची गोष्ट जर लोणच्यात विचित्र वास येऊ लागला, रंग बदललेला वाटला, वर लेयर्ड पांढरा बुरशीचा थर दिसला, मसाल्याचा टेक्स्चर बदलला तर ते लोणचं लगेच फेकून द्या. 'थोडं दिसतंय पण चालेल' असा हट्ट इथे जीवघेणा ठरू शकतो.
म्हणून पुढच्या वेळी घरात लोणचं तयार कराल, किंवा बाजारातून रेडीमेड लोणचं आणाल, तर साठवण, स्वच्छता आणि तेल-विनेगरचं प्रमाण या तीन गोष्टींवर जास्त लक्ष द्या. चव आणि आरोग्य यांची सांगड तेव्हाच जुळते जेव्हा चवमागचं विज्ञानही समजून घेतलं जातं.