Sunday, November 16, 2025 06:15:13 PM

Healthy Routine : सुखी, आनंदी दीर्घायुष्यासाठी हार्वर्ड प्रोफेसरचे खास मंत्र; जाणून घ्या, ही दिनचर्या तुम्हाला कशी ठेवेल निरोगी

निरोगी आणि आनंदी जीवनाचे रहस्य असलेल्या खास सवयींबद्दल आपण जाणून घेऊया. या सवयी स्वतःच्या जीवनात पाळत असल्याचे हार्वर्ड विद्यापीठातील प्रोफेसर आर्थर ब्रूक्स यांनी म्हटले आहे.

healthy routine  सुखी आनंदी दीर्घायुष्यासाठी हार्वर्ड प्रोफेसरचे खास मंत्र जाणून घ्या ही दिनचर्या तुम्हाला कशी ठेवेल निरोगी

Morning Habits for Healthy Life : तुमच्या दिवसाची सुरुवात केवळ तुमचा संपूर्ण दिवसाचा मूड, ऊर्जा आणि सर्जनशीलता (Creativity) निश्चित करत नाही, तर तुम्ही दिवसभर किती सकारात्मक, केंद्रित आणि productive राहाल, हे ठरवते. हार्वर्ड विद्यापीठातील प्रोफेसर आर्थर ब्रूक्स यांनी एक खास सकाळची दिनचर्या (Morning Routine) तयार केली आहे, ज्यामुळे ते दिवसभर आनंदी, उत्साही आणि त्यांची सर्जनशीलता चांगली राहते. निरोगी आणि आनंदी जीवनाचे रहस्य असलेल्या त्यांच्या खास सवयींबद्दल आपण जाणून घेऊया.

प्रोफेसर आर्थर ब्रूक्स यांच्या निरोगी जीवनाच्या सवयी
1. सूर्योदयापूर्वी उठा (Early Rise): प्रोफेसर ब्रूक्स दररोज पहाटे 4:30 वाजता उठतात. संशोधनातून सिद्ध झाले आहे की, सकाळी लवकर उठल्याने एकाग्रता, सर्जनशीलता आणि स्मरणशक्ती सुधारते. ब्रूक्स यांच्या मते, लवकर उठल्याने त्यांना शांत मनाने आणि सकारात्मक ऊर्जेने दिवसाची सुरुवात करण्याची संधी मिळते.

2. शारीरिक हालचाल (Physical Activity): उठल्याच्या अवघ्या 15 मिनिटांत ब्रूक्स त्यांच्या घरातील जिममध्ये जातात आणि एक तास व्यायाम करतात. त्यांच्या व्यायामामध्ये कार्डिओ आणि रेझिस्टन्स ट्रेनिंग या दोन्हींचा समावेश असतो. ते सांगतात की, आठवड्याचे सातही दिवस व्यायाम केल्याने त्यांची ऊर्जा वाढते आणि मूड सुधारतो.

3. मेडिटेशन किंवा जर्नलिंग: ब्रूक्स दररोज दलाई लामांपासून प्रेरित असलेले विश्लेषणात्मक ध्यान (Analytical Meditation) करतात. कधी ते चर्चमध्ये जातात, तर कधी गाडीत बसून कॅथोलिक ध्यान करतात. हे ध्यान त्यांना आत्म्याशी जोडण्यास आणि मन शांत ठेवण्यास मदत करते. जे लोक ध्यान (Meditation) करू इच्छित नाहीत, त्यांनी 20-30 मिनिटे जर्नलिंग करूनही तीच मानसिक शांती मिळवता येते, असे ब्रूक्स सुचवतात.

हेही वाचा - Health Tips : दिवसभर थकल्यासारखं वाटत राहतं? हेल्दी डाएट असूनही या गोष्टींमुळे जाणवते सुस्ती

4. प्रोटीनयुक्त नाश्ता: निरोगी शरीरासाठी योग्य पोषण आवश्यक आहे. ब्रूक्स सकाळच्या नाश्त्यामध्ये 60 ग्रॅम प्रोटीन घेतात. यासाठी ते अनेकदा बिना फ्लेवरचे ग्रीक योगर्ट (Greek Yogurt) मध्ये व्हे प्रोटीन, अक्रोड (Walnuts) आणि बेरीज मिसळून खातात. या उच्च प्रोटीन आहारातमुळे त्यांचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि ते दिवसभर उत्साही (Energetic) राहतात.

5. 'फ्लो' मध्ये काम करा (Work in the Flow): सकाळच्या वेळी सर्वांचीच ऊर्जा उच्च पातळीवर असते. ब्रूक्स त्यांची ही ऊर्जा सोशल मीडियावर वाया घालवत नाहीत. त्याऐवजी, ते ती एकाग्र आणि गुणात्मक कामात (Quality Work) वापरतात. "जेव्हा मी असे करतो, तेव्हा मला दोन तासांचे सुपर क्रिएटिव्ह आउटपुट मिळते," असे ते सांगतात. यामुळे त्यांची दिवसभराची उत्पादकता (Productivity) टिकून राहते.

6. स्वत:चा दिनक्रम निश्चित करा (Create Your Routine): प्रत्येकाचे जीवनशैली आणि गरजा वेगवेगळ्या असल्याने, प्रत्येकाचा दिनक्रमही वेगळा असू शकतो, असे ब्रूक्स सांगतात. ते लोकांना स्वतःच्या जीवनशैलीनुसार दिनक्रम तयार करण्याचा सल्ला देतात.

तुम्हालाही निरोगी आणि आनंदी जीवन जगायचे असेल, तर प्रोफेसर ब्रूक्स यांच्या या सवयींचा अवलंब करायला विसरू नका.

हेही वाचा - Health Tips: अंजीर दुधात भिजवल्याने 'हे' फायदे मिळतील, जाणून घ्या

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री