Health Tips : बिया (Seeds) आकाराने लहान असल्या तरी त्या जीवनसत्त्वे, खनिजे, हेल्दी फॅट्स आणि वनस्पती-आधारित प्रथिने यांनी समृद्ध असतात. या बिया तुमची ऊर्जा वाढवतात, हृदय निरोगी ठेवतात आणि पचनक्रिया सुधारतात. पण, प्रत्येक प्रकराच्या बिया प्रत्येकासाठी, विशेषत: वृद्धांसाठी योग्य नसतात. वाढत्या वयानुसार वृद्धांचे पचनसंस्था (Digestive System) थोडे कमजोर होते, ज्यामुळे काही बियाणे बद्धकोष्ठता (Constipation), गॅस किंवा पोट फुगणे यासारख्या समस्या निर्माण करू शकतात.
काही लहान आणि कडक बिया घशात अडकण्याचा धोकाही संभवतो. याशिवाय, काही बिया रक्तदाब (Blood Pressure), कोलेस्टेरॉल किंवा मधुमेह यांसाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांचा परिणाम कमी करू शकतात. त्यामुळे, वृद्धांनी कोणत्या बिया टाळाव्यात किंवा मर्यादित प्रमाणात खाव्यात, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
वृद्धांनी टाळायची/मर्यादित खायची सीडस् किंवा बिया:
1. खसखस (Poppy Seeds): खसखसमध्ये असे काही नैसर्गिक घटक असतात जे पेन किलर्स (वेदनाशामक) किंवा रक्त पातळ करणाऱ्या (Blood Thinning) औषधांचा परिणाम बदलू शकतात. वृद्धांना ते चघळणे किंवा गिळणेही कठीण होते. त्यामुळे, खसखस टाळावे किंवा केवळ शिजवलेल्या पदार्थांमध्येच कमी प्रमाणात वापरावे.
2. चिया सीड्स (Chia Seeds): चिया सीड्समध्ये फायबर आणि ओमेगा-3 मोठ्या प्रमाणात असले तरी, सुक्या स्वरूपात खाल्ल्यास ते पोटात फुगतात आणि गॅस किंवा बद्धकोष्ठतेची समस्या वाढवतात. म्हणून, चिया सीड्स नेहमी पाणी किंवा दुधात भिजवूनच खावेत. शिवाय, वृद्धांसाठी ते दिवसातून 1-2 चमचे सुरक्षित असू शकतात.
हेही वाचा - Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा राहील सतेज आणि ग्लोइंग! दररोज खजूर खाल्ल्याने मिळेल नैसर्गिक सौंदर्य
3. अळशीच्या बिया (Flax Seeds) : पचन आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अळशी फायदेशीर आहे. परंतु, जास्त प्रमाणात खाल्ल्यास गॅस किंवा अतिसार होऊ शकतो. त्यातील काही घटक औषधांचा परिणाम कमी करू शकतात. त्यामुळे, अळशीच्या बिया खाण्यापूर्वी बारीक करून घ्याव्या आणि रोज थोड्याच प्रमाणात खाव्यात.
4. सूर्यफूल बीज (Sunflower Seeds) : सूर्यफुलाचे कच्चे बीज आरोग्यासाठी चांगले असते. परंतु बाजारात उपलब्ध पॅकबंद बियांमध्ये मीठ किंवा साखर मिसळली जाते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि किडनीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे, वृद्धांनी नेहमी मीठ किंवा साखर नसलेले सूर्यफूल बीज मर्यादित प्रमाणात खावे.
5. हेम्प सीड्स (Hemp Seeds - भांग बीज): हेम्प सीड्स प्रथिनांनी आणि हेल्दी फॅटने समृद्ध असले तरी, जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट खराब होऊ शकते. विशेषतः या बिया रक्त पातळ करणाऱ्या औषधांच्या परिणामावर परिणाम करू शकतात. वृद्धांनी दिवसातून 1-2 मोठे चमचेपर्यंतच हे बीज घ्यावे आणि जर कोणती औषधे घेत असाल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा - How To Store Sweets: फ्रीजमध्ये मिठाई ठेवताना लक्षात ठेवा 'ही' सोपी पण महत्वाची गोष्ट
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)