मुंबई: गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल झाल्याने सगळीकडे व्हायरल ताप, सर्दी-खोकला आणि डेंग्यूसारख्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. ताप आला की अनेकांच्या प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात. प्लेटलेट्स कमी झाल्याने अशक्तपणा, अंगावर लाल चट्टे त्यामुळे आरोग्याला धोका वाढतो. अशा वेळी औषधांसोबतच योग्य आहार घेणे खूप गरजेचे आहे.प्लेटलेट काउंट वाढवण्यासाठी काय खावे, याबद्दल डॉक्टर काय सांगतात पाहूया.
1. पपईच्या पानांचा रस – सर्वात प्रभावी उपाय
डेंग्यू किंवा व्हायरल तापात प्लेटलेट कमी झाल्यावर डॉक्टर पपईच्या पानांचा रस पिण्याचा सल्ला देतात. पपईच्या पानांमध्ये असलेले एन्झाइम्स प्लेटलेट वाढवण्यास मदत करतात. रोज सकाळी 2 चमचे ताजा रस पिऊ शकता.
2. डाळिंब आणि बीट – रक्त वाढवण्यासाठी
प्लेटलेट कमी झाल्याने रक्ताची कमतरता जाणवते. अशा वेळी डाळिंब, बीट आणि गाजराचा ज्यूस खूप फायदेशीर आहे. यात लोह आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असतात, ज्यामुळे रक्तातील प्लेटलेट्स वाढतात.
हेही वाचा – वयाची 30 वर्षे ओलांडली? महिलांनो, आरोग्याची काळजी घ्या! ‘या’ 5 तपासण्या का महत्त्वाच्या
3. नारळ पाणी आणि भरपूर पाणी
तापात शरीर डिहायड्रेट होते. डिहायड्रेशनमुळे प्लेटलेट आणखी कमी होतात. त्यामुळे दिवसातून 2-3 वेळा नारळ पाणी प्या. तसेच 3 ते 4 लिटर साधं पाणी पिणं गरजेचं आहे.
4. हिरव्या पालेभाज्या आणि किवी
पालक, मेथी सारख्या हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन K असतं, जे रक्त गोठण्यास आणि प्लेटलेट वाढवण्यास मदत करतं. सोबतच किवी, संत्री, आवळा यांसारखी व्हिटॅमिन C असलेली फळं खा. व्हिटॅमिन C मुळे प्लेटलेट लवकर वाढतात.
5. गुळ-शेंगदाणे
रोज मूठभर भाजलेले शेंगदाणे आणि गुळ खाल्ल्याने लोह मिळते आणि प्लेटलेट काउंट स्थिर राहतो.
काय टाळावे?
प्लेटलेट कमी असताना तेलकट, मैद्याचे पदार्थ, कोल्ड्रिंक, दारू आणि जास्त साखर टाळा. हे पदार्थ रक्त पातळ करतात.
महत्त्वाची सूचना: प्लेटलेट 1.5 लाखांपेक्षा कमी झाल्यास किंवा अंगावर लाल डाग, नाकातून रक्त येत असेल तर घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. तात्काळ डॉक्टरांना भेटा.
(Disclaimer: ही बातमी सामान्य माहितीसाठी आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.