भिवंडीकरांनो पाणी जपून वापरा! 18 तास पाणी पुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Bhiwandi Water Cut News : राज्यातील जलाशयांमधील पाणीसाठा घटल्याने भिवंडी शहरात पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत नियोजन करावे लागणार असून, काही काळ कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.

भिवंडीकरांनो पाणी जपून वापरा! 18 तास पाणी पुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?
Bhiwandi Water Cut

भिवंडी शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. येत्या काही दिवसात शहरात पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार दर बुधवारी आणि गुरुवारी तब्बल 18 तासांसाठी पाणीपुरवठा हा बंद राहणार आहे. खरं तर राज्यात यंदा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे जलाशयांतील पाणीसाठा हा झपाट्याने घटलेला आहे. यामुळे पाणी बचत करणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. त्यामुळे 16 ऑक्टोबर पासून किमान 10 टक्के तर पाणी बचतीचे निर्देश दिलेले आहे.

पाणी कपातीची वेळ जाणून घ्या
मिळालेल्या माहितीनुसार, स्टेम या कंपनीकडून पाणीपुरवठा हा केला जातो. या कंपनीने दर बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते गुरुवारी पहाटे 3 वाजेपर्यंत असा तब्बल 18 तासांचा शटडाऊन घेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या काळात भिवंजी शहराचा पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

हेही वाचा- पाण्याच्या मुद्द्यावरून डोंबिवलीत संतापाचा उद्रेक; अपुरा पुरवठा अन् 36 तासांच्या कपातीविरोधात रहिवाशांचे थेट अधिकाऱ्यांना आव्हान

शटडाऊनंर दुसऱ्या दिवशीही पाण्याचा दाब कमी राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कमी प्रमाणात नागरिकांना पाणीपुरवठा होईल. असे सलग दोन दिवस नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केलेले आहे. प्रत्येक नागरिकांनी पाण्याचा वापर हा काटकसरीनेच करावा, पाणी वाया घालवू नये शिवाय पाणी बचतीसाठी महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.

 

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number