‘मी मजबूर झालोय, कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून…’ कर्जवसुलीच्या ताणावाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमध्ये लिहलं…

Latur News
Latur News

खाजगी फायनान्सच्या कर्जाला कंटाळून 28 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुलगा येथे घडली आहे. मयत दत्ता सूर्यकांत कुंभार या तरुणाने खाजगी फायनान्स कंपन्यांकडून 06 लाख 20 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.

लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे कर्ज परत करणे शक्य नसल्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले आहे. या आत्महत्येची दखल घेत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट करत राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असून आत्महत्या करत आहेत, परंतु सरकार सत्तेच्या नशेत मशगुल असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांना हेक्टर एक लाख रुपये व शेतमजुरांना 25 हजार रुपयांची मदत करण्याची आग्रही मागणी केली आहे.

हेही वाचा- विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह; पालघरमध्ये खळबळ!

यावेळी मयत तरुण दत्ता सूर्यकांत कुंभार याने एका चिठ्ठीत लिहलं की, “मी दत्तात्रय सुर्यकांत कुंभार भला या दुष्काळग्रस्त परस्थीतीमुळे मी कर्जात असुन मला फायनान्सकडून खूप त्रास होत असून मी आता आत्यमत्या करण्यास मजबुर झालो आहे. तर मला व माझ्या परीवाराला त्रास होऊ नये हि मी सरकारला विनंती करत आहे व माझे लोन हे माफ करून मला सहकार्य करावे व माझ्या कुंरबासाठी काही तरी मदत सरकारने करावी.” या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात तरुणाने सुसाईड नोट लिहिल्याची माहिती समोर आली आहे. कर्जाचा वाढता ताण आणि आर्थिक अडचणींचा मुद्दाही या घटनेमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version