येवल्यात रस्त्यावरून चालत असलेल्या महिलेचा पाय कापला, परिसरात लोकांची गर्दी; नेमकं काय घडलं?

मकरसंक्रांतीचा सण जवळ येत असताना पतंग उडवण्याचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. मात्र, याच पतंगबाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

येवल्यात रस्त्यावरून चालत असलेल्या महिलेचा पाय कापला, परिसरात लोकांची गर्दी; नेमकं काय घडलं?
Yeola News

मकरसंक्रांतीचा सण जवळ येत असताना पतंग उडवण्याचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. मात्र, याच पतंगबाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मकर संक्रांतीला अद्याप सुमारे दोन महिने बाकी असतानाच येवला शहरात पतंगबाजीला सुरुवात झाली आहे. येवला शहरात संक्रांतीपूर्वीच नायलॉन मांजाचा कहर पाहायला मिळाला असून, या जीवघेण्या मांजामुळे एका महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे.

हेही वाचा- गावकऱ्यांनी दिला होता इशारा, मुलांनी ऐकलं नाही! कल्याणच्या दोन क्रिकेटपटूंसोबत रत्नागिरीत काय घडलं?

बजरंग मार्केट परिसरात रस्त्यावर पडलेल्या नायलॉन मांज्यामुळे एका महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे नायलॉन मांज्याच्या वापरावर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने विक्री व वापरावर प्रभावी बंदी घालून जनजागृती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अनेकदा रस्त्यावर किंवा झाडांमध्ये अडकलेला मांजा नागरिकांच्या संपर्कात आल्यास गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. याशिवाय, पक्ष्यांसाठीही हा मांजा जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे नायलॉन मांजाच्या विक्रीवर आणि वापरावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. संक्रांतीच्या काळात अशा घटना घडू नयेत, यासाठी पोलिस आणि संबंधित यंत्रणांनी दुकानदारांवर कारवाई करणे, बाजारपेठांमध्ये तपासणी वाढवणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number