Friday, July 11, 2025 11:57:23 PM

धुळे जिल्ह्यात कृषी विभागाची बोगस बियाणांवर मोठी कारवाई

धुळे जिल्ह्यात कृषी विभागाने बोगस बियाण्यांवर मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यात तीन ठिकाणी कारवाई करत कृषी विभागाने सुमारे 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

धुळे जिल्ह्यात कृषी विभागाची बोगस बियाणांवर मोठी कारवाई

धुळे: धुळे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धुळे जिल्ह्यात कृषी विभागाने बोगस बियाण्यांवर मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यात तीन ठिकाणी कारवाई करत कृषी विभागाने सुमारे 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सकाळपासून कृषी विभागाचे पथक धुळे शहराबाहेरून येणाऱ्या खाजगी प्रवासी वाहनांची तपासणी करत होते. मात्र, दोन प्रवासी वाहनांमध्ये भारतात बंदी असलेल्या बियाण्यांचे सुमारे बाराशे पाकिटे आढळून आले. हे बियाणे गुजरात राज्याकडून अकोला शहराकडे नेले जात होते.

हेही वाचा: पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणाऱ्या आरोपी रवी वर्माची आज पोलीस कोठडी संपणार?

खरीप हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करतात. त्यातच अशा बोगस बियाण्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अशातच, बोगस बियाणे विक्रेत्यांना संशय येऊ नये, यासाठी कृषी विभागाने ही कारवाई अतिशय गुप्त पद्धतीने तसेच वेषांतर करून केली आहे.

हेही वाचा: पाकिस्तानात गेलेल्या नागपुरमधील सुनीता जामदाडे न्यायालयात हजर

फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी?

'कापसाचे बियाणे खरेदी करताना नेहमी परवानाधारक विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे. बियाण्याच्या पॅकेटवर कंपनीचे नाव, बॅच क्रमांक, उत्पादन आणि मुदत समाप्ती तारीख तपासावी. जर कोणतेही संशयास्पद बियाणे आढळले तर ताबडतोब जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा,' असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिले आहे.


सम्बन्धित सामग्री