Amravati Ashram School News : अचानक छातीत वेदना, रुग्णालयात दाखल केले, पण…; अमरावतीच्या आश्रमशाळेतील 11 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

अमरावतीच्या भातकुली येथील मातोश्री गौराबाई गुढे अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या 11 वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

Amravati Ashram School News : अचानक छातीत वेदना, रुग्णालयात दाखल केले, पण…; अमरावतीच्या आश्रमशाळेतील 11 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू
Amravati Ashram School News

अमरावतीच्या भातकुली येथील मातोश्री गौराबाई गुढे अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या 11 वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात असलेल्या अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील पाचवी इयत्तेतील विद्यार्थिनी प्रिया गणेश मावस्कर हिचा 25 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मेळघाट मधील राणीगाव येथील प्रिया गणेशराव मावसकर हिला छातीत वेदना होत असल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. विद्यार्थिनीची आरोग्य तपासणी, वैद्यकीय नोंदवही, पालकांना दिलेली माहिती, खासगी रुग्णालयातील उपचार आणि शवविच्छेदनाचा अभाव यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हेही वाचा- Chandwad Crime : चांदवडमध्ये संतापजनक घटना! 8 वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न; परिसरात खळबळ

या घटनेनंतर आदिवासी मुलीच्या मृत्यूची सखोल चौकशी करा अशी मागणी करण्यात आली आहे. आदिवासी विद्यार्थिनींच शवविच्छेदन न करता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे आदिवासी विद्यार्थींनिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.

आदिवासी संघटनांनी या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन/एसआयटी चौकशी, जबाबदारी निश्चित करणे आणि मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number