Prashant Jagtap : नव्या वाटेवरचा जुना खेळाडू ! प्रशांत जगताप आज ‘या’ पक्षात करणार अधिकृत प्रवेश

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार यांच्यात संवाद वाढत असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात वेग घेतला होता. मात्र, प्रशांत जगताप यांना ही राजकीय तडजोड मान्य नसल्याचे सांगितले.

Prashant Jagtap : नव्या वाटेवरचा जुना खेळाडू ! प्रशांत जगताप आज ‘या’ पक्षात करणार अधिकृत प्रवेश

Prashant Jagtap : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत हालचाली आणि दोन्ही गटांच्या कथित जवळीकीमुळे नाराज झालेले पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी आता अधिकृतपणे आपली नवी राजकीय दिशा निश्चित केल्याचे दिसत आहे. शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर 24 तासांच्या आतच जगताप मुंबईत दाखल झाले असून, आज ते काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.

पवार कुटुंबातील 'जवळीक' ठरली राजीनाम्याचे कारण?

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार यांच्यात संवाद वाढत असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात वेग घेतला होता. मात्र, कट्टर पुरोगामी भूमिका मांडणाऱ्या प्रशांत जगताप यांना ही राजकीय तडजोड मान्य नसल्याचे सांगितले. 'तत्त्वाशी तडजोड करण्यापेक्षा पदाचा त्याग केलेला बरा', अशी भूमिका घेत त्यांनी काल आपला राजीनामा सोपवला होता. राजीनामा देतानाच त्यांनी आगामी महापालिका निवडणूक लढवण्याचे संकेत देत नव्या प्रवासाची तयारी दर्शवली होती.

हेही वाचा – Maharashtra Government: प्रकल्पग्रस्तांसाठी सरकारचा गेमचेंजर निर्णय! स्वतंत्र महामंडळ येणार; पुनर्वसन ते रोजगार मिळणार एका छताखाली

शिवसेना की काँग्रेस?  

प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोन्ही गटांकडून त्यांना ऑफर देण्यात आली होती. मात्र, पुण्याच्या राजकीय मैदानात भाजपला तगडे आव्हान देण्यासाठी त्यांनी काँग्रेसची निवड केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यांच्या समर्थकांनीही काँग्रेस प्रवेशासाठी कौल दिल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. योगायोगाने, आज मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसची पुणे महापालिका निवडणूक आणि जागावाटपासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीला पुणे प्रभारी सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे दिग्गज नेते उपस्थित आहेत. याच बैठकीच्या वेळी प्रशांत जगताप यांचे मुंबईत पोहोचणे, हा निव्वळ योगायोग नसून नियोजित पक्षप्रवेशाची रणनीती असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा – Raj Thackeray: ठाकरे युतीनंतर मनसेला पहिला मोठा धक्का; विश्वासू नेत्याने धरला शिंदेसेनेचा हात

पुण्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल?

प्रशांत जगताप यांच्या रूपाने काँग्रेसला पुण्यात एक आक्रमक आणि अनुभवी चेहरा मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात खिंडार पडल्याने महाविकास आघाडीतील जागावाटपाचे समीकरण आता बदलण्याची चिन्हे आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा बदल भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतो. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number