Thursday, November 13, 2025 02:27:07 PM

Uber Metro Ticket Booking: मेट्रो प्रवासासाठी रांगेचा त्रास संपला; डिजिटल मेट्रो तिकीटिंगसाठी उबरची मुंबईमध्ये नवी सुविधा

ही सेवा उबर, मुंबई मेट्रो वन आणि ONDC नेटवर्क यांच्या भागीदारीतून सुरू करण्यात आली आहे. या डिजिटल उपक्रमामुळे स्टेशनवरील लांब रांगा आणि कागदी तिकिटांचा त्रास पूर्णतः संपणार आहे.

uber metro ticket booking मेट्रो प्रवासासाठी रांगेचा त्रास संपला डिजिटल मेट्रो तिकीटिंगसाठी उबरची मुंबईमध्ये नवी सुविधा

मुंबई: उबरने मुंबईकरांसाठी प्रवास आणखी सोयीस्कर बनवला आहे. आता वर्सोवा - अंधेरी - घाटकोपर मेट्रो मार्गावरील मेट्रो लाईन 1 चे तिकीट थेट उबर अॅपवरून खरेदी करता येणार आहे. दिल्ली आणि चेन्नईनंतर मुंबई हे देशातील तिसरं शहर ठरलं आहे, जिथे उबरची ही अत्याधुनिक सुविधा सुरू झाली आहे. या नव्या डिजिटल सुविधेमुळे स्टेशनवरील लांब रांगा आणि कागदी तिकिटांचा त्रास पूर्णतः संपणार आहे.

उबर, मुंबई मेट्रो वन आणि ONDC नेटवर्क यांच्या भागीदारीतून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे प्रवासी आता फक्त काही क्लिकमध्ये तिकीट बुक करून प्रवासाचा आनंद घेऊ शकतात. ONDC चे वरिष्ठ कार्यकारी संचालक नितीन नायर यांनी सांगितले, “उबर अॅपवर मेट्रो तिकीटिंग सुरू होणे म्हणजे भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांची ताकद दाखवणारा उत्तम नमुना आहे. दिल्ली आणि चेन्नईनंतर आता मुंबईतही या सुविधेची जोड मिळाल्याने डिजिटल सार्वजनिक वाहतुकीला नवं बळ मिळेल.”

हेही वाचा: No Shave November Reason : सोशल मीडियावर 'नो शेव्ह नोव्हेंबर'चा ट्रेंड, जाणून घ्या इतिहास आणि कारण

उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे ग्राहक विकास संचालक शिव शैलेन्द्रन म्हणाले, “मुंबईतील प्रवाशांसाठी आम्ही प्रवास अधिक स्मार्ट, जलद आणि त्रासमुक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. तिकीट बुकिंगपासून पेमेंटपर्यंत सर्व काही एका अॅपवर उपलब्ध करून देणे म्हणजे प्रवाशांसाठी अधिक परवडणारे आणि सोयीचे.”

पेमेंटसाठी UPI चा पर्याय उपलब्ध असल्याने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळेल आणि “कॅशलेस प्रवास” ही संज्ञा अधिक मजबूत होईल. लवकरच उबर अॅपवर रिअल-टाइम मेट्रो अपडेट्स, स्टेशनची माहिती आणि मार्ग नियोजन साधनेही उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास केवळ जलदच नाही तर अधिक स्मार्ट आणि आनंददायक होईल. या नव्या उपक्रमाद्वारे उबरने शहरी वाहतूक अधिक स्मार्ट आणि डिजिटल बनवण्याच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल टाकलं आहे.

हेही वाचा: Multiplex Overcharging Rates: 50 रुपयांचे कोल्डड्रिंक 400 रुपयांना देता? मल्टिप्लेक्समधील मनमानी दरांवर सर्वोच्च न्यायालयाने ओढले ताशेरे

 

सम्बन्धित सामग्री