राजकीय वर्तुळात खळबळ! भाजप शहराध्यक्षला आधी अटक, आता पक्षाकडून निलंबनाची कारवाई; नेमकं प्रकरण काय?

फुलंब्री येथे एका महिला रुग्णावरील कथित लैंगिक अत्याचार आणि आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.
city president uttam dhoke
city president uttam dhoke

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील समर्थ क्लिनिकचे संचालक डॉ. रामदास तरटे यांच्याशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या प्रकरणात भाजपचे शहराध्यक्ष उत्तम ढोके यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर यांनी 22 ऑक्टोबर रोजी निलंबनाचे आदेश जारी केले. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात ढोके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्यांना अटक केली असून, न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांची रवानगी हर्सूल मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. या प्रकरणाची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. भाजपने शहराध्यक्ष उत्तम ढोके यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगरहून गोव्याला जाणारी विमानसेवा अवघ्या 24 दिवसांत बंद; प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग खुलासा

जिल्ह्यातील फुलंब्री येथे एका महिला रुग्णावरील कथित लैंगिक अत्याचार आणि आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात समर्थ क्लिनिकचे संचालक डॉ. रामदास महादू तरटे यांच्यानंतर भाजपचे फुलंब्री शहराध्यक्ष उत्तम ढोके यांना पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांच्या तपासात ढोके यांचा कथित सहभाग समोर आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या वृत्तानुसार, फुलंब्री बसस्थानक परिसरातील समर्थ क्लिनिकमध्ये उपचारासाठी आलेल्या 45 वर्षीय महिलेने डॉ. रामदास तरटे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. डॉक्टरांनी औषध दिल्यानंतर गुंगीच्या अवस्थेत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच, या घटनेशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करण्यात आल्याचा आरोपही प्रकरणात आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 20 ऑक्टोबर रोजी डॉ. तरटे यांना अटक केली. त्यानंतर व्हिडिओ कोणी तयार केला आणि तो सोशल मीडियावर कोणी प्रसारित केला, याचा तपास सुरू करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सुरू असताना भाजपचे फुलंब्री शहराध्यक्ष उत्तम भागाजी ढोके यांचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी 22 ऑक्टोबर रोजी पहाटे त्यांना अटक केली. या प्रकरणात व्हिडिओ तयार करणे किंवा प्रसारित करण्यासंबंधी त्यांचा कथित सहभाग तपासला जात आहे. मात्र, त्यांच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत. पोलिसांच्या तपासातून या प्रकरणातील नेमकी भूमिका स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version