पुण्यात ‘जय महाराष्ट्र’च्या पत्रकारावर भ्याड हल्ला; आमदार रोहित पवार यांचा स्थानिक पत्रकारांनी नोंदवला जाहिर निषेध

पुण्यात रोहित पवारांच्या समर्थकाने 'जय महाराष्ट्र' न्यूज चॅनेलचे पुण्यातील पत्रकार निखिल सुक्रे यांच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला.

पुण्यात ‘जय महाराष्ट्र’च्या पत्रकारावर भ्याड हल्ला; आमदार रोहित पवार यांचा स्थानिक पत्रकारांनी नोंदवला जाहिर निषेध
JM Special news

पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांच्यातील संवादादरम्यान, गुरुवार, 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी रोहित पवारांच्या समर्थकाने ‘जय महाराष्ट्र’ न्यूज चॅनेलचे पुण्यातील पत्रकार निखिल सुक्रे यांच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला. इतकेच नव्हे तर त्यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पवार आणि विद्यार्थी यांच्यातील या संवादाचे वार्तांकन करण्यासाठी MPSC चे परीक्षार्थी आणि पत्रकार मोठ्या संख्येने जमले असताना ही घटना घडली. पवार यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी MPSC च्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीच्या संदर्भात, पुण्यात शास्त्री रोडवरील इंदुलाल कॉम्प्लेक्स येथे सायंकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचे त्यांचे नियोजन होते. दरम्यान, येथील उपस्थित सर्व माध्यमांच्या पत्रकारांनी या घटनेचा निषेध नोदंवला असून जोपर्यंत रोहित पवार माफी मागत नाहीत, तोपर्यंत रोहित पवार यांच्या पुण्यातील कार्यक्रमांचे वार्तांकन न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या घटनेबाबत मोठ्या संख्येने ‘जय महाराष्ट्र’ चॅनेलला प्रत्यक्षदर्शी पत्रकरांनी, पत्रकार संघांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून याबाबत आपला निषेध नोंदवला आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार यांच्या डोळ्यासमोर घडलेल्या घटनेवर त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने त्यांनी माफी मागावी, अशी मागणी ‘जय महाराष्ट्र’ चॅलेनने केली आहे.

हेही वाचा : दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर काळाचा घाला; सहलीसाठी आलेल्या 8 जणांचा बुडून अंत

जय महाराष्ट्र पुणे प्रतिनिधी निखिल सुक्रे यांच्यावर हल्ला झाला त्यावर रोहित पवार यांच्याकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. रोहित पवार यांनी सर्व प्रकरण एबीव्हीपीचा कार्यकर्ता होता, असे स्पष्ट केले असून नेमकं यातील तथ्य काय आहे यावर अजून देखील प्रश्न उपस्थित आहे. संबंधित तरुणाला तात्काळ अटक करावी अशी देखील मागणी केली आहे. घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल निषेध व्यक्त करतो, असं ट्विट करत संपूर्ण प्रकरण झाकण्याचा प्रयत्न रोहित पवार किंवा रोहित पवार यांच्या टीमकडून आहे का, असा प्रश्न जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी यांच्याकडून उपस्थित होत आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number