दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! सरकारकडून मिळणार 5 हजार रुपये; पण अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सरकारकडून 5 हजारांची मदत जाहीर करण्यात आली असून या निर्णयाचा लाभ कसा घ्यावा? त्यासाठी काय करावे याबाबत सविस्तर जाणून घ्या.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! सरकारकडून मिळणार 5 हजार रुपये; पण अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Farmers Scheme

महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा पाहायला मिळत आहेत. राज्यात यापूर्वी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. मात्र, दुष्काळाबाबत प्राप्त तक्रारी आणि ट्रिगर-1 व ट्रिगर-2 या निकषांचा आढावा घेतल्यानंतर आणखी 40 तालुक्यांची भर घालण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत फडणवीसांनी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना अग्रीम मदत देण्यात आल्याचे जाहीर केले. ही अग्रीम मदत सुमारे 6000 कोटी रुपयांची असणार असून सुमारे एक ते सव्वा कोटी शेतकर्‍यांना प्रथमच 5000 रुपयांची मदत मिळणार असल्याची माहिती दिली.

हेही वाचा- मोठी बातमी! MPSC च्या अध्यक्षपदी नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती; विवेक भीमनवार यांचा कार्यभार आता कोण संभाळणार?

मंत्रिमंडळ बैठकीतील या निर्णयामुळे दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या मदतीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे का, अर्ज ऑनलाइन करता येणार की संबंधित कार्यालयात जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. दरम्यान सरकारच्या या निर्णयाचा लाभ कसा घ्यावा? त्यासाठी काय करावे याबाबत सविस्तर जाणून घ्या.

सरकारच्या या निर्णयाचा लाभ कसा घ्यावा?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांना कोणतेही कागदपत्रे किंवा अर्ज देण्यासाठी सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. MahaDBT पोर्टलमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं समाविष्ट नाहीत, त्यांनी राज्य सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन नाव निंदावणे गरजेचे असणार आहे. या नाव नोंदणीसाठी आधारनंबर लागणार असून सातबारा, 8-अ, सुरू असलेले बँक खाते आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच जे शेतकरी यापूर्वीच केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना किंवा महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना नव्याने अर्ज करावा लागणार नाही. या शेतकऱ्यांना जुन्या डेटाबेसच्या आधारे खात्यात 5 हजार दिले जाणार आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number