मोठी बातमी! MPSC च्या अध्यक्षपदी नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती; विवेक भीमनवार यांचा कार्यभार आता कोण संभाळणार?

MPSC विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या रजा कालावधीत सतीश वाघोले यांची MPSC च्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

मोठी बातमी! MPSC च्या अध्यक्षपदी नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती; विवेक भीमनवार यांचा कार्यभार आता कोण संभाळणार?
MPSC News

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार हे सध्या पेपरलीक प्रकरणात सुट्टीवर गेले असल्यानं त्यांच्याकडे असलेले प्रभारी कारभार आता आयोगाचे सदस्य सतीश वाघोले यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे जोपर्यंत भीमनवार हे सुट्टीवर असतील तोपर्यंत वाघोले हेच एमपीएससीच्या अध्यक्षपदाची सुत्रं सांभाळणार आहेत.

हेही वाचा- राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड! शरद पवार गटाची साथ सोडली; तीन नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते अजित पवार गटात सामील
यावेळी पत्रात दिलेल्या माहितीनुसार, “भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 316 च्या खंड (1 क) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे, श्री. विवेक लक्ष्मीकांत भीमनवार, भा.प्र.से., अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या रजा कालावधीत त्यांच्या पदाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी श्री. सतिश बबन वाघोले, सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांची दिनांक 16 ऑक्टोबर, 2026 पासून, अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग या पदाचा अतिरिक्त कार्यभार देऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करीत आहेत.”

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number