कोर्टाचा मोठा निकाल; खोटा बनाव रचून पतीला संपवणाऱ्या पत्नी अन् प्रियकराला फाशीची शिक्षा

मेरठमधील बहसुमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकबरपूर सादात गावात घडलेल्या या खळबजनक प्रकरणात, पती अमित कश्यपला निर्घृणपणे संपवणारी त्याची पत्नी रविता आणि तिचा प्रियकर अमरदीप या दोघांनाही अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

कोर्टाचा मोठा निकाल; खोटा बनाव रचून पतीला संपवणाऱ्या पत्नी अन् प्रियकराला फाशीची शिक्षा
Ravita and Amardeep death sentence

उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात गाजलेल्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाची पुनरावृत्ती करत आणखी एक अत्यंत थरारक आणि बहुचर्चित ‘सर्पदंश प्रकरण’ (Snake Case) समोर आले होते. मेरठमधील बहसुमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकबरपूर सादात गावात घडलेल्या या खळबजनक प्रकरणात, पती अमित कश्यपला निर्घृणपणे संपवणारी त्याची पत्नी रविता आणि तिचा प्रियकर अमरदीप या दोघांनाही अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. 7 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने या दोघांना हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवले होते, तर आता झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावल्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात मोठी चर्चा रंगली आहे.

सापाच्या दंशामुळे मृत्यू झाल्याचा रचला होता बनाव

ही घटना 12 एप्रिल 2025 रोजी घडली होती. अमित कश्यप हा आपल्याच घरात मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, त्याच्या मृतदेहाजवळ एक साप जिवंत फिरत असल्यामुळे, अमितचा मृत्यू सापाच्या दंशामुळे झाला असावा, असा प्राथमिक संशय निर्माण करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या सापाला पकडले आणि डब्यात बंद केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. परंतु, शवविच्छेदनाच्या अहवालाने या संपूर्ण प्रकरणाला एक कलाटणी दिली. अहवालात स्पष्ट झाले की, अमितचा मृत्यू सापाच्या विषाने नव्हे, तर गळा आवळून किंवा गुदमरल्यामुळे झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास खुनाच्या दिशेने वळवला.

प्रेमसंबंधातून रचला होता खळबजनक कट

तपासादरम्यान पोलिसांच्या हाती जे पुरावे लागले, त्याने सगळेच अवाक झाले. अमित कश्यपची पत्नी रविता हिचे गावातीलच अमरदीप नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. अमरदीपचे अमितच्या घरी सतत येणे-जाणे होते आणि तो त्याच्यासोबत कामही करत असे. या अवैध संबंधांच्या आड येणाऱ्या पतीला कायमचे संपवण्यासाठी या दोघांनी अतिशय शिताफीने हत्येचा कट रचला होता. खुनानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी पलंगावर साप सोडला होता. तपासादरम्यान पोलिसांनी ज्या व्यक्तीकडून तो साप आणला होता, त्याला शोधून काढले आणि नंतर त्याला या खटल्यात सरकारी साक्षीदार बनवले.

हेही वाचा – नागपुरात चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुरडीवर अत्याचार; शाळेत शिक्षिकेला सांगितली आपबिती, भाडेकरूला अटक

सरकारी वकिलांनी सादर केलेल्या भक्कम पुराव्यांच्या आधारे हा पूर्वनियोजित खून सिद्ध झाला. उल्लेखनीय म्हणजे, काही काळापूर्वी गाजलेल्या ‘ब्लू ड्रम’ प्रकरणात पती सौरभ राजपूतची हत्या करणाऱ्या मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल यांनाही न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती, आणि आता या नवीन निकालामुळे मेरठ न्यायालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number