नवी मुंबई: राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि पालक यांचे दर गगनाला भिडले आहेत. या दरवाढीचा थेट परिणाम नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेमध्ये दिसून येत आहे. एपीएमसी मार्केटमध्ये दररोज हजारो रुपयांचा भाजीपाला खरेदी-विक्री केला जातो. मात्र, सध्या बाजारात भाजीपाला कमी प्रमाणात येत असल्यामुळे दर वाढले आहेत. किरकोळ विक्रेत्यांनाही याचा फटका बसला आहे.
हेही वाचा: डॉक्टरांचा हलगर्जीपणा; प्रसूती दरम्यान महिलेच्या पोटात राहिला कापडी तुकडा
राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि पालक यांचे दर गगनाला भिडले आहेत. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेमध्ये या दरवाढीचा थेट परिणाम दिसून येत आहे. एपीएमसी मार्केटमध्ये दररोज हजारो रुपयांचा भाजीपाला खरेदी-विक्री केला जातो. मात्र, सध्या बाजारात भाजीपाला कमी प्रमाणात येत असल्यामुळे दर वाढले आहेत. किरकोळ विक्रेत्यांनाही याचा फटका बसला आहे. तसेच, या दरवाढीमुळे नागरिकांच्या खिशाला चांगलाच चाट बसत आहे.
हेही वाचा: अवकाळी पावसानंतरही मराठवाड्यात पाणीटंचाई कायम
सध्या कांदा 30 रुपये किलो, टोमॅटो 60 रुपये किलो, फरसबी 120 ते 160 रुपये किलो, गवार 120 रुपये किलो, फ्लॉवर 80 ते 120 रुपये किलो, वांगी 60 ते ८० रुपये किलो तर कोथिंबीर आणि पालक 50 रुपये जुडी दराने विकले जात आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत हे दर 30 ते 40 टक्क्यांनी वाढले आहेत.