शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष पुन्हा पेटणार? नवी मुंबईतील क्लस्टर प्रकल्पांवरून महायुतीत खळबळ

नवी मुंबईतील क्लस्टर पुनर्विकासावरील स्थगिती नगरविकास विभागाने उठवल्याने गणेश नाईकांना धक्का बसला आहे
Eknath Shinde
Eknath Shinde

नवी मुंबईतील क्लस्टर पुनर्विकास योजनेवरून भाजप आणि शिवसेनेतील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने महापालिकेचा स्थगितीचा निर्णय बाजूला सारत काही क्लस्टर प्रकल्पांना पुढे जाण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे वनमंत्री गणेश नाईक आणि शिंदे यांच्यातील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे.

नाईकांच्या विरोधानंतरही क्लस्टरला हिरवा कंदील

नवी मुंबई महापालिकेत सत्ताधारी भाजपने शहरातील पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता व्यक्त करत क्लस्टर पुनर्विकासाला स्थगिती देण्याचा ठराव मंजूर केला होता. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधांचा आधी अभ्यास करावा, अशी भूमिका या निर्णयामागे होती. मात्र, नगरविकास विभागाने हा ठराव मान्य न करता वाशी आणि घणसोली परिसरातील पाच प्रमुख क्लस्टर प्रकल्पांवरील स्थगिती उठवली आहे. या निर्णयामुळे रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना मिळण्याची शक्यता आहे.

शिंदे-नाईक संघर्ष पुन्हा चर्चेत

नवी मुंबईतील क्लस्टर योजनेला गणेश नाईक यांनी यापूर्वीही विरोध दर्शवला होता. वाढीव बांधकाम आणि लोकसंख्येमुळे शहरातील पायाभूत सुविधांवर परिणाम होऊ शकतो, अशी त्यांची भूमिका आहे. दुसरीकडे, धोकादायक आणि जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित घरे मिळण्यासाठी पुनर्विकास आवश्यक असल्याचे शिंदे समर्थकांचे म्हणणे आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version