राज्यातील 1 लाख 15 हजार शेतकऱ्यांना दिलासा, कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर; ‘या’ शेतकऱ्यांना लाभ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून यात एकापेक्षा अधिक बँकांत कर्जखाती असलेल्या 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

राज्यातील 1 लाख 15 हजार शेतकऱ्यांना दिलासा, कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर; ‘या’ शेतकऱ्यांना लाभ
maharashtra farmers

मुंबई : दिवाळीआधी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून यात एकापेक्षा अधिक बँकांत कर्जखाती असलेल्या 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या योजने अंतर्गत एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्ज खाती आणि 2 लाखापेक्षा कमी थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश असून ही यादी आधार प्रमाणीकरणासाठी गुरुवार, 22 ऑक्टोबर रोजी सहकार विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. महाआयटीने तयार केलेल्या योजना पोर्टलवर बँकांनी एकूण 31.17 लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. महाआयटीने केलेल्या संगणकीय प्रक्रियेनंतर आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांपैकी 15.85 लाख पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांवर आतापर्यंत 13 हजार 275 कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रात हवामानाचा लहरीपणा कायम! कुठे पावसाच्या सरी, तर कुठे उन्हाचा चटका; जाणून घ्या हवामानाचा रिपोर्ट

या यादीत एकापेक्षा जास्त बँकेकडून पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जबाकीची रक्कम 31 मार्च 2026 रोजीची आहे. 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी 31 मार्च 2026 रोजीच्या कर्ज थकबाकीची खातरजमा करुन नजीकच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर जमा होणा आहे.

आतापर्यंत तीन याद्या जाहीर झाल्या – 

पहिली यादी – 16 लाख 96 हजार 201

दुसरी यादी – 4 लाख 19 हजार 737

तिसरी यादी – 3 लाख 51 हजार 192

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान | Maharashtra Teacher and Graduate Constituency Election

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number