Wednesday, June 25, 2025 02:14:13 AM

ड्रग्ज कारखान्यातून गॅस गळती

बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर टी १५० मधील आरती ड्रग्स कारखान्यात शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गॅस गळती झाली.

ड्रग्ज कारखान्यातून गॅस गळती 

१३ जुलै, २०२४ पालघर : बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर टी १५० मधील आरती ड्रग्स कारखान्यात शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गॅस गळती झाली. यानंतर, कामगारांची धावपळ सुरु झाली. या धावपळीत सहाजण बेशुद्ध पडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या गॅस गळतीमुळे परिसरात पिवळ्या रंगाच्या धुराचं साम्राज्य पसरलं होतं . 
गॅस गळती झाल्यानंतर सर्व कामगार कारखान्यातून बाहेर पडले. ब्रोमीन गॅसची गळती झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच  स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. 
या गॅस गळतीमुळे काही कामगारांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. यात सहा कामगार बेशुद्ध पडल्याचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे.  


सम्बन्धित सामग्री