EPFOची नवीन डिजिटल सुविधा; आता WhatsAppवर घरबसल्या मिळणार PF खात्याची शिल्लक आणि पासबुकची माहिती

आता पीएफ खातेधारकांना आपल्या भविष्य निर्वाहनिधी खात्याशी संबंधित माहिती मिळवणे अधिक सोपे झाले असून, घरबसल्या एका क्लिकवर खात्याची शिल्लक आणि पासबुक तपासणे शक्य होणार आहे.

EPFOची नवीन डिजिटल सुविधा; आता WhatsAppवर घरबसल्या मिळणार PF खात्याची शिल्लक आणि पासबुकची माहिती
EPFO

EPFO WhatsApp Services: कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) कोट्यवधी नोकरदार सदस्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक घोषणा केली आहे. आता पीएफ खातेधारकांना आपल्या भविष्य निर्वाहनिधी खात्याशी संबंधित माहिती मिळवणे अधिक सोपे झाले असून, त्यासाठी कोणतीही धावपळ करावी लागणार नाही. ईपीएफओने आपल्या ग्राहकांसाठी थेट व्हॉट्सॲपवर विविध सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यामुळे घरबसल्या एका क्लिकवर खात्याची शिल्लक आणि पासबुक तपासणे शक्य होणार आहे.

व्हॉट्सॲप सेवा वापरण्याची सोपी पद्धत आणि हेल्पलाइन क्रमांक

ही नवीन डिजिटल सेवा वापरणे अगदी सोपे आहे. यासाठी ईपीएफओने अधिकृत क्यूआर कोड (QR Code) जारी केला आहे, जो स्कॅन करून चॅटबॉटशी जोडता येऊ शकते. तसेच, ज्यांना कोड स्कॅन करायचा नाही, ते अधिकृत क्रमांक म्हणून +918796441800 हा मोबाईल नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह करू शकतात. हा नंबर व्हॉट्सॲपवर सुरू केल्यानंतर वापरकर्त्याला प्रथम पसंतीची भाषा निवडण्याचा पर्याय मिळतो.

हेही वाचा – ‘तुमची फिल्म रिलीज होतेय का? प्रमोशनसाठी गेला होतात?’ आमिर खानच्या भाच्याला कोर्टाची फटकार!

चॅटबॉटवर मिळणाऱ्या चार महत्त्वाच्या सुविधांचे पर्याय

भाषा निवडल्यानंतर युजर्सच्या समोर चार प्रमुख पर्याय उपलब्ध होतात, ज्याद्वारे विविध सेवांचा लाभ घेता येतो:
– शिल्लक रक्कम तपासणे (Check Balance)
– खात्यातील शेवटचे 5 व्यवहार पाहणे
– पीएफ पासबुक डाऊनलोड करणे
– भाषेमध्ये बदल करण्याचा पर्याय निवडणे
यापैकी हव्या त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ताबडतोब संबंधित तपशील स्क्रीनवर उपलब्ध होतात.

डिजिटल युगात ईपीएफओचे मोठे पाऊल आणि ऑटोमॅटिक सेटलमेंटची तयारी
डिजिटल युगात आपल्या सदस्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी ईपीएफओने सुरू केलेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. याशिवाय, ज्या सभासदांची जुनी आणि बंद पडलेली खाती आहेत आणि ज्यांमध्ये 1000 रुपयांपर्यंतची शिल्लक रक्कम पडून आहे, अशा खात्यांचे ऑटोमॅटिक सेटलमेंट करण्याची तयारी देखील संघटनेतर्फे सुरू आहे. या नव्या सुविधांमुळे पीएफ ग्राहकांची मोठी सोय होणार असून, प्रशासकीय कामांमधील सुलभता वाढणार आहे.

हेही वाचा – महाराष्ट्रातील न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी! मुंबईपासून धुळे-सांगलीपर्यंत खळबळ, नेमकं काय घडलं?

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number