बारामती: काही दिवसांपूर्वी पुण्यातील वडगाव बुद्रूक येथे गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षाला धडक दिली. त्यामुळे, रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे, गौतमी पाटीलवर टीका केली जात आहे. सध्या पीडित रिक्षाचालकावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी, एक मोठी अपडेट समोर आली आहे. 'पीडित रिक्षाचालकासाठी मी मदतीचा हात पुढे केला, मात्र, पीडित रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी मदत घेण्यास नकार दिला', अशी खंत यावेळी गौतमी पाटीलने व्यक्त केली आहे.
हेही वाचा: Jijamata Mahila Sahakari Bank: RBI ची मोठी कारवाई! साताऱ्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रद्द
गौतमी पाटील काय म्हणाली?
मंगळवारी रात्री पुण्यातील इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे देवीच्या उत्सवानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान, गौतमी पाटीलने पत्रकारांशी संवाद साधला. गौतमी पाटील म्हणाली की, 'कार माझीच होती. मात्र, हा अपघात जेव्हा घडला तेव्हा मी कारमध्ये नव्हते. याबद्दल मी अनेकदा सांगितले, तरीही मला सतत ट्रोल केलं जात आहे. मात्र, आता मी ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत आहे'. पुढे गौतमी पाटील म्हणाली की, 'पीडित रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी मी मदतीचा हात पुढे केला, मात्र, त्यांनी मदत घेतली नाही'.