गोंदियात मध्यरात्री भीषण अपघात; दोन दुचाकींची समोरासमोर धडक,तीन युवकांचा मृत्यू, एक गंभीर

गोंदिया-कोहमारा मार्गावर हिरडामाली गावाजवळ दोन दुचाकींची आमोरासमोर धडक होऊन तीन युवकांचा मृत्यू झाला. एक युवक गंभीर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोंदियात मध्यरात्री भीषण अपघात; दोन दुचाकींची समोरासमोर धडक,तीन युवकांचा मृत्यू, एक गंभीर

गोंदिया : गोंदिया-कोहमारा मार्गावर दोन दुचाकींची आमोरासमोर जोरदार धडक होऊन तीन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास हिरडामाली गावाजवळ घडली. या अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले असून, एक युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया-कोहमारा मार्गावरून दोन दुचाकी जात असताना हिरडामाली गावाजवळ त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली.

या दुर्घटनेत तीन युवकांचा मृत्यू झाला. तर आणखी एक युवक गंभीर जखमी झाला आहे. जखमी युवकाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर गोरेगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

रात्रीच्या वेळी झालेल्या या भीषण अपघातामुळे गोंदिया-कोहमारा मार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. दोन्ही दुचाकींचा वेग, रस्त्यावरील परिस्थिती तसेच अन्य संभाव्य कारणांचा तपास केला जात आहे.

या अपघाताची माहिती परिसरात पसरताच नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. तीन युवकांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातातील मृत आणि जखमी युवकांची ओळख पटवण्याची तसेच घटनेशी संबंधित पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number