मुंबई: लालपरीने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसेसमधून 150 किमीपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 1 जुलैपासून आगाऊ आरक्षण केल्यास भाड्यात 15 टक्के सूट मिळेल, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. ही सूट केवळ पूर्ण भाडे भरणाऱ्या प्रवाशांना लागू होणार आहे. तथापी, सवलतीच्या तिकिटांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना ही सूट लागू होणार नाही. ही योजना दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांसारख्या गर्दीच्या हंगामाशिवाय वर्षभर वैध असेल.
हेही वाचा - साई संस्थानमध्ये बोगस सुरक्षारक्षक भरती?
आषाढी एकादशी आणि गणेशोत्सवादरम्यानही मिळणार लाभ -
दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी 1 जून रोजी एमएसआरटीसीच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर केलेला हा उपक्रम सर्व प्रकारच्या बसेसमध्ये लागू केला जात आहे. तथापी, आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला किंवा गणेशोत्सवासाठी कोकणाला नियमित एमएसआरटीसी बसेस बुक करणाऱ्या प्रवाशांनाही 1 जुलैपासून ही सवलत मिळू शकेल. तथापि, ही सवलत विशेष अतिरिक्त बसेसना लागू होणार नाही.
हेही वाचा - 5 जुलैचा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द; हिंदी सक्तीच्या आदेशावर सरकारचा यूटर्न
ई-शिवनेरी बसेससाठी विशेष लाभ -
मुंबई-पुणे ई-शिवनेरी मार्गावर वारंवार प्रवास करणारे प्रवासी देखील आगाऊ बुकिंग करून ही 15% सवलत मिळवू शकतात. प्रवासी तिकीट खिडकीवर किंवा अधिकृत वेबसाइट npublic.msrtcors.com द्वारे किंवा MSRTC बस आरक्षण मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे 15 टक्के सूट मिळवू शकतात.