Sunday, June 15, 2025 12:47:55 PM

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या गडावर पावसाने दिली जोरदार हजेरी

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावर सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या मुसळधार पावसामुळे गडाच्या पायऱ्यांवरून पाणी धबधब्यासारखे वाहताना दिसत होते.

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या गडावर पावसाने दिली जोरदार हजेरी

पुणे : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावर सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या मुसळधार पावसामुळे गडाच्या पायऱ्यांवरून पाणी धबधब्यासारखे वाहताना दिसत होते आणि संपूर्ण परिसर निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याने न्हालून निघाला होता.

हेही वाचा: वरळी भुयारी मेट्रोमध्ये पाणी शिरल्याबाबत मुंबई मेट्रोने दिले स्पष्टीकरण

दरम्यान, खंडेरायाच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भक्तांनी या नयनरम्य दृश्याचा मनमुराद आनंद घेतला असून गडाच्या पायऱ्यांवरून वाहणारे पाणी, पावसाच्या सरी आणि गडावर पसरलेली हिरवळ यामुळे जेजुरीच्या गडावर एक वेगळं सौंदर्य खुललं. तसेच, अनेक भाविकांनी या क्षणांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केले, तर काहींनी पावसात चिंब भिजत गड चढण्याचा अनुभव घेतला. पावसाच्या सरींमुळे गडावर थंडगार वाऱ्याची झुळूक वाहत होती आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले. भक्तांनी 'यळकोट यळकोट जय मल्हार' या गजरात खंडेरायाचे दर्शन घेतले. मुसळधार पावसामुळे गडावरची धूळ जणू निघून गेली आणि परिसर ताजेतवाने झाला.

हेही वाचा: विक्रमी पावसामुळे मुंबईत रेल्वे वाहतूक आणि विमान वाहतूक प्रभावित

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना 'रेड अलर्ट', 'यलो अलर्ट' आणि 'ऑरेंज अलर्ट' जारी केले आहेत.

यलो अलर्ट: मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नागपूर आणि इतर अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

रेड अलर्ट: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.

ऑरेंज अलर्ट: पुणे, सातारा, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

​​​​​​​हेही वाचा: साताऱ्यातील मानगंगा नदीला महापूर; आंधळी धरण ओव्हर फ्लो
 


सम्बन्धित सामग्री