HSC SSC Exam Dates: महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) 2025-26 शैक्षणिक वर्षाच्या दहावी आणि बारावी परीक्षा वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावी (HSC) परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 पासून 18 मार्च 2026 पर्यंत घेण्यात येणार असून, दहावी (SSC) परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 पासून 18 मार्च 2026 पर्यंत होणार आहे. ही माहिती मंडळाने अधिकृत प्रेस नोटद्वारे प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांत या परीक्षा घेण्यात येतील. उच्च माध्यमिक परीक्षा (बारावी) फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल, तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येईल.
हेही वाचा - ST Employees Diwali Bonus: दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 6 हजार रुपयांचा बोनस जाहीर
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिकांचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. बारावीची तोंडी परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित केली जाईल. दहावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा 2 ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान होणार आहेत.
हेही वाचा - Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावरून प्रवास होणार सुलभ; 29 किलोमीटरचा उन्नत मार्ग अन् 6000 कोटी रुपयांचा निधी; जाणून घ्या काय आहे MMRDA चा नवा प्लॅन
- उच्च माध्यमिक परीक्षा (HSC 2026) – 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 (माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांसह)
- प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन – 23 जानेवारी 2026 ते 9 फेब्रुवारी 2026
- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC 2026) – 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026
- प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन – 2 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 (शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांसह)
तथापी, विद्यार्थ्यांच्या अभ्यास नियोजनासाठी आणि परीक्षेच्या ताण कमी करण्यासाठी वेळापत्रक वेळेवर जाहीर करण्यात आले आहे. प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी व लेखी परीक्षा यांचे सविस्तर विषयवार वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रकाशित केले जाईल.