ऐन दिवाळीत विमान प्रवाशांना मोठा धक्का! इंडिगोची उड्डाणे रद्द; पूर्ण वेळापत्रक आले समोर

IndiGo Flight Cancellation : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या निर्णयामुळे ऑक्टोबरच्या उत्तरार्धातील हवाई प्रवासाचे नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

ऐन दिवाळीत विमान प्रवाशांना मोठा धक्का! इंडिगोची उड्डाणे रद्द; पूर्ण वेळापत्रक आले समोर
IndiGo Flight Cancellations Ahead of Diwali

छत्रपती संभाजीगरहून प्रवास करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी समोर आलेली आहे. नेमक्या दिवाळी सणाच्या तोंडावरच इंडिगो एअरलाइन्सने संभाजीनगर विमानतळावरील महत्त्वाची विमान फेऱ्या या रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इंडिगोचे विमानतळ व्यवस्थापक अनिरुद्ध पाटील यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाला पत्र पाठवून ही माहिती दिलेली आहे.

बंदचे कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, काही तांत्रिक आणि व्यवस्थापकीय असलेल्या कारणांमुळे हा निर्णय घेतला गेला, असे कंपनीने म्हटले आहे. दिवाळी या महत्त्वाच्या सणाच्या दिवसातच विमानांचे बुकिंग आधीच फुल झालेले दिसून येते. अनेकांनी महिनाभर आधीच तिकीट काढले आहे. अशाच वेळी अचानक विमाने रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

हेही वाचा-मुंबईकरांसाठी मोठी बातमी! बहुप्रतीक्षित उड्डाणपूल आजपासून खुला; कोणत्या दोन प्रमुख मार्गांना मिळणार जोडणी?

‘या’ दिवशी उड्डाणे रद्द राहणार
असंख्य प्रवाशांना आता सणाच्या दिवसात प्रवास करण्यासाठी पर्यायी प्रवास शोधावा लागणार आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा खरं तर हैदराबाद आणि नवी मुंबई या मार्गावरील प्रवाशांना बसणार आहे. तेव्हा तिकिटांचा परतावा किंवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी एटीडीएफचे सुनीत कोठारी यांनी केली. महत्त्वाचे म्हणजे, 15 ते 31 ऑक्टोबरदरम्यान इंडिगोची काही विमान उड्डाणे रद्द राहणार आहेत.

कोणत्या मार्गांना फटका?
हैदराबाद मार्गावरील सकाळी 8 वाजून 10 आणि 8 वाजून 30 मिनिटांच्या दोन्ही फेऱ्या या 17 आणि 19 ऑक्टोबर दरम्यान रद्द राहणार आहे. तर नवी मुंबई मार्गावरील संध्याकाळच्या फेऱ्या या 15 ते 24 ऑक्टोबर आणि पुन्हा 26 ते 31 ऑक्टोबर दरम्यान रद्द केल्या आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number