IRCTC वरून तिकीट बुक करताना अनेकदा सीट्स शिल्लक दिसतात, तरीही तिकीट बुक करताना ते वेटिंग (WL) किंवा RAC मध्ये जाते, या समस्येतून आता सामान्य प्रवाशांची सुटका होणार आहे. भारतीय रेल्वेने सामान्य प्रवाशांसाठी आगाऊ तिकीट बुकिंगची मुदत केवळ 60 दिवसांपर्यंत मर्यादित केली आहे. तर परदेशी पर्यटक आणि अनिवासी भारतीयांसाठी (NRI) ही सुविधा वेगळी असून त्यांना फॉरेन टुरिस्ट कोट्यातून (FTQ) तब्बल एक वर्ष म्हणजेच 365 दिवस आधी तिकीट बुक करता येणार आहे.
भारतात फिरण्यासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांना आता एक वर्ष आधीपर्यंत आगाऊ रेल्वे तिकीट बुक करता येणार आहे. ही सुविधा केवळ परदेशी नागरिकांसाठीच नव्हे, तर अनिवासी भारतीयांसाठी (NRI) देखील उपलब्ध आहे.फॉरेन टुरिस्ट कोटा (FTQ) या कोट्याअंतर्गत परदेशी पर्यटक आणि NRI ना कन्फर्म तिकीट मिळू शकते.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
या सुविधेसाठी कोणती कागदपत्रे लागतात?
भारतीय रेल्वेच्या नियमानुसार हा कोटा परदेशी पासपोर्टधारक आणि NRI साठी राखीव आहे. या कोट्यातून प्रवास करण्यासाठी वैध परदेशी पासपोर्ट किंवा NRI दर्जा असणे बंधनकारक आहे. या सुविधेमुळे NRI भारतात येण्यापूर्वीच आपल्या प्रवासासाठी कन्फर्म सीट बुक करू शकतात.
ही सुविधा कोणत्या वर्गासाठी आहे?
ही सुविधा सर्व वर्गांसाठी नाही. ती केवळ निवडक प्रीमियम वर्गासाठी उपलब्ध आहे, यामध्ये फर्स्ट एसी (1A), सेकंड एसी (2A) आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार (EC) चा समावेश आहे.
या सुविधेसाठी काय करावे लागते?
IRCTC वर नोंदणी करताना किंवा प्रोफाइल अपडेट करताना आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबर नोंदवावा लागतो. मोबाईल पडताळणीसाठी नोंदणीकृत नंबरवर एक OTP येतो, त्यानंतर ई-मेल पडताळणीसाठी ई-मेलवर दुसरा OTP पाठवला जातो. पडताळणी पूर्ण झाल्यावर FTQ कोट्यातून तिकीट बुक करता येते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.