कल्याण-डोंबिवलीमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आंबिवलीसह शहाडला जोडणाऱ्या उल्हास नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाच्या शेजारीच आता नवा भव्य पूल बांधण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालेला असून, एमएमआरडीएने केडीएमसीला सविस्तर असा प्रकल्प अहवाल तराय करण्याचेही आदेश दिलेले आहेत.
कल्याणकरांचा वेळ वाचणार
केडीएमसीच्या महापौर अॅड.हर्षाली चौधरी यांनी नुकतीच उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत या पुलासाठीचा तब्बल 110 कोटी रुपयांचा निधी मागितला होता. उपमुख्यमंत्र्यांनी या मागणीलाही तात्काळ प्रतिसाद देत प्रस्ताव पुढे नेण्याच्या सुचना देखील दिलेल्या आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही निधीसाठीचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
किती पदरी असणार पूल?
सध्या या ठिकाणी अस्तित्वा असलेला जुना पूल हा वाढत्या वाहनांच्या दररोजच्या वाहतूकीमुळे अपुरा पडत आहे. रोज होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे तास वाया जातात, तर रुग्णवाहिका तसेच अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही अडथळा निर्माण होतो. मात्र, आता उल्हास नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाच्या शेजारीच आता नवा भव्य पूल बांधण्यात येणार आहे, तो तब्बल 6 लेनचा असणार आहे. वडवली, आंबिवली, मोहने, टिटवाळा या भागात झपाट्याने नागरीकरण होत आहे. हा नवा पूल आणि त्याचे जोडरस्ते हे कल्याण शहराशी संपर्क करणे अधिक सोपे होणार आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update