कोकण रेल्वेचं आरक्षण सुरू होताच फुल्ल

कोकण रेल्वेचं आरक्षण सुरू होताच फुल्ल

कोकण, १९ मे २०२३, प्रतिनिधी : कोकण रेल्वे सुरु झाल्यापासून चाकरमानी कोकणवासीयांसाठी मुंबईतून गावंचक प्रवास स्वस्त आणि वेगवान झाला आहे, नावातच कोकण असल्याने हे रेल्वे आपल्या हक्काची असल्याचे कोकणवासीयांना वाटते. परंतु असे असले तरीही कोकणवासियांच्या गणपती,शिमगा आणि मे महिन्याच्या सुट्टीतील हक्काच्या गाड्यांचे आरक्षण मिळवणे फार कठीण झाले आहे. कोकण रेल्वेकढुन आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर होतात, आरक्षण सुरु होते आणि तात्काळ गाड्या फुल होतात.

या तिकीट आरक्षणात कलावंजार होत आल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या आहे. मात्र रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे . तसेच गुरवारपासूनच गणेशउत्सवासाठी येणाऱ्या चाकरमन्यांचे रेल्वे आरक्षण सुरु झाले आहे. मात्र हे आरक्षण सुरु होताच फुल्ल झाल्याने चाकरमानी नाराज झाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version