कोकणात पावसाची तुरळक हजेरी, मुंबईत 36 अंशांचा चटका; पुढील हवामानाचा अंदाज काय?

गेल्या 24 तासांतील हवामानात काही बदल पाहायला मिळाले. दक्षिण कोकण-गोवा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची नोंद झाली.

कोकणात पावसाची तुरळक हजेरी, मुंबईत 36 अंशांचा चटका; पुढील हवामानाचा अंदाज काय?

गेल्या 24 तासांतील हवामानात काही बदल पाहायला मिळाले. दक्षिण कोकण-गोवा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची नोंद झाली, तर उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहिले.

पावसाची आकडेवारी –
कोकणात सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथे 2 सेंमी, तर संगमेश्वर, गुहागर, वाळपई आणि कुडाळ येथे 1 सेंमी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर आणि राधानगरी येथे 1 ते 2 सेंमी पाऊस झाला.

तापमानाचा विचार करता, राजकोट येथे 39.8 अंश सेल्सिअससह सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली, तर जळगावात 19.6 अंश सेल्सिअससह सर्वात कमी किमान तापमान नोंदवले गेले. दरम्यान, रायगड, नाशिक, लातूर आणि बीड जिल्ह्यात ताशी 24 ते 35 किमी वेगाने जोरदार वारे वाहिले.

हेही वाचा – दिवाळीपूर्वी गॅस सिलेंडरच्या दरांबाबत मोठी अपडेट; दिलासा की महागाईचा फटका?; प्रमुख शहरांतील दर जाणून घ्या

मच्छीमारांसाठी महत्त्वाचा इशारा:
कर्नाटक, केरळच्या किनारपट्टीवर, लक्षद्वीप आणि कोमोरिन परिसरात आज ताशी 35 ते 45 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, वाऱ्याचा झोत ताशी 55 किमी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी या भागात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

अरबी समुद्र निरीक्षण:
आज 25 ऑक्टोबर रोजी अरबी समुद्र आणि लगतच्या लक्षद्वीप क्षेत्रावरील कमी दाबाचे क्षेत्र आता अरबी समुद्र आणि लगतच्या केरळच्या किनारपट्टीवर आहे. त्याच्याशी संबंधित चक्रीय वाऱ्याची रचना समुद्रसपाटीपासून 3.1 किमी उंचीपर्यंत विस्तारली आहे.

महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर-

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

मुंबईचा अंदाज:
मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तासांत सकाळच्या वेळी धुके असणार आहे, तर दुपार आणि संध्याकाळच्या वेळी आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील. कमाल तापमान 36 अंश आणि किमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
पुढील 48 तासांत आकाश मुख्यतः निरभ्र राहील, कमाल 36 अंश आणि किमान 24 अंश सेल्सिअस तापमान राहील.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number