कुडाळमध्ये काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.हिर्लोक पंचक्रोशीत या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्यामुळे अनेक दुकानांचे छप्पर उडाले असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे काही भागातील वीज सेवा बंद करावी लागली होती.
या बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहेच, पण सर्वसामान्य नागरिकांनाही याचा फटका बसत आहे. मान्सूनचा परतीचा पाऊस गेल्यानंतर आलेल्या या अवकाळी पावसामुळे हवामानात मोठा बदल झाला असून त्याचा परिणाम आरोग्यावरही होत आहे.
दिवसा अति-उष्ण आणि रात्री दमट वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर व्हायरल ताप, सर्दी-खोकला अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यंदा राज्याचे हवामान पावसाच्या सुरुवातीपासूनच कोलमडले असून त्याचा सर्वांनाच फटका बसत आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.