दोन दिवसांपासून शेतकरी बेपत्ता, शेतात अवयव सापडताच गाव हादरलं; समोर आलं ‘ते’ सत्य

Leopard Attack Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोधेगाव येथील शेतकरी सुरेश अहिरे बेपत्ता झाल्यानंतर परिसरात चिंता व्यक्त केली जात होती. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागासमोर बिबट्याच्या बंदोबस्ताचे आव्हान उभे राहिले आहे.
बिबट्याचा हल्ला
Leopard Attack Farmer

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या तालुक्यातून एक हादरवणारी घटना समोर आलेली आहे. गोधेगाव येथील शेतकऱ्याला बिबट्याने शेतात ओढून ठार केल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसा, सुरेश अहिरे असे शेतकऱ्याचे नवा असून ते 15 तारखेच्या रात्रीपासून बेपत्ता होते. घरच्यांनी त्यांचा तपास केला मात्र ते कुठेही सापडले नाही. शेवटी दोन दिवसानंतर त्यांच्या शेतातच त्यांच्या शरीराचे काही अवयव आढळून आले.

प्राथमिक अंदाजानुसार, बिबट्यानेच सुरेश यांच्यावर हल्ला करत त्यांना शेतात ओढून नेले आणि ठार केले. या घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या घटनेचा पंचनामा करत तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे गोधेगावसह संपूर्ण नेवासा तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे असून तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version