दिवाळीपूर्वी गॅस सिलेंडरच्या दरांबाबत मोठी अपडेट; दिलासा की महागाईचा फटका?; प्रमुख शहरांतील दर जाणून घ्या

LPG Cylinder Price : दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर एलपीजी सिलेंडरच्या दरांकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. घरगुती गॅसच्या किमती, व्यावसायिक सिलेंडरचे दर आणि शहरानुसार असलेल्या फरकांमुळे ग्राहकांच्या बजेटवर नेमका काय परिणाम होणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

दिवाळीपूर्वी गॅस सिलेंडरच्या दरांबाबत मोठी अपडेट; दिलासा की महागाईचा फटका?; प्रमुख शहरांतील दर जाणून घ्या
LPG Cylinder Price

दिवाळी अगदी काही दिवसांवर असताना देशभरातील नागरिकांचे लक्ष हे गॅस सिलेंडरच्या दराकडे लागलेले आहे. धनतेरस, दिवाळीत घरात अनेक पदार्थ बनवले जातात, तर हॉटेल-रेस्टॉरंमध्ये देखील गर्दी वाढते. या कारणामुळे स्वयंपाकाच्या गॅसचा वापर वाढतो आणि बजेटवरही मोठा परिणाम होतो.

घरगुती ग्राहकांना किती दिलासा?
आज जाहीर झालेल्या नव्या दरानुसार, 25 ऑक्टोबर रोजीच्या दरानुसार घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळेच सणाच्या खर्चाचे नियोजन करत असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण 1 ऑक्टोबर रोजी कमर्शियल सिलेंडर 62.50 रुपयांनी महाग झाल्याने आता ढाबा,हॉटेल तसेच कॅटरिंग व्यवसायिकांना अजूनही जास्त खर्च सोसावा लागत आहे.

हेही वाचा – नियमित पाणीपट्टी भरूनही पाणी नाही! कोंढव्यात आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात; नागरिकांचा संताप

स्थानिक कर तसेच वाहतूक खर्चामुळे देखील प्रत्येक शहरात दर हे वेगळे आहेत. आज 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत ही दिल्लीत 939.50 रुपये आहे, मुंबईमध्ये 941.50 रुपये, नोएडा-गाझियाबादमध्ये 939.50 रुपये आहे. महत्त्वाचे म्हणजे ऑक्टोबर महिन्यात घरगुती दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

गॅस किती रुपयांना?
दुसरीकडे 19 किलोच्या असलेल्या कमर्शियल सिलेंडरच्या दरामध्ये दिल्लीत 2,810 रुपये, मुंबईमध्ये 2,764.50 रुपये, कोलकात्यात 2,954 रुपये आहे. तेल कंपन्या या दर महिन्याला एक तारखेला कच्च्या तेलाचे आंतरराष्ट्रीय दर तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती पाहून ठरविले जाता. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी घरगुती सिलेंडरचे दर स्थिर ठेवले जातात, तर कमर्शियल दर बाजारातील चढ-उतारावर अवलंबून असतात.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number