देशभरात पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. NEET पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला होता. त्यानंतर आता MPSC परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरूनही विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यासर्व घटनांमुळे शिक्षण व्यवस्थेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
हेही वाचा- RBI रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढणार; गृहकर्जाचा हप्ता आणि मुदत ठेवींवर काय परिणाम ?
मेहनत, वेळ आणि पैसा खर्च करून परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर अशा घटनांचा थेट परिणाम होत असल्याने पारदर्शक परीक्षा प्रक्रियेची मागणी जोर धरत आहे. असं असताना आता पुण्यातून आणखी एक परिक्षा रद्द झाल्याची बातमी समोर आली आहे. महाज्योतीची स्कॉलरशिपची आज परीक्षा पार पडत आहे.
दरम्यान पुण्यातील आंबेगाव बुद्रक येथील सण ब्राईट स्कूल या परीक्षा केंद्रावर कंप्युटर उपलब्ध नसल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षेची वेळ 9 ते 11 अशी असतानाही अद्याप मुली परीक्षा केंद्र बाहेर उभ्या आहेत. अद्याप परीक्षा देण्याची संधी त्यांना मिळालेली नाही. त्यामुळे परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला आहे.