सुखाच्या संसारात रक्तरंजित वळण! आधी भयंकर कृत्य, त्यानंतर जे घडलं त्याने सर्वांनाच बसला धक्का

Maharashtra Crime News : वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात घरगुती वादातून घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. पती-पत्नीमधील वादाचे रूपांतर गंभीर हल्ल्यात झाले. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
वाशिम गुन्हेगारी
Washim Crime

वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. घरगुती वादातून पतीने पत्नीची चाकून सपासप वार करत निर्घृण हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरुन वाद झालेला होता. संतापलेल्या पतीने पत्नीवर थेट चाकून अनेक वार केले.

या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झालेली होती. त्यानंतर तिला जखमी अवस्थेतमध्येच तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी पती फरार झाला होता. पोलिसांना संबंधित घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवत फरार झालेल्या आरोपी योगेश ढोबळे याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे रिसोड शहरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version